पाली,कपिलधारवाडी येथील ग्रामस्थ यंदा परिवर्तन घडवणार -आ.संदीप क्षीरसागर

पाली,कपिलधारवाडी येथील ग्रामस्थ यंदा परिवर्तन घडवणार -आ.संदीप क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
श्री मन्मथ स्वामींच्या आशिर्वादाने पाली/कपिलधार वाडी येथील ग्रामस्थ यंदा नक्कीच परिवर्तन घडविणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सर्व उमेदवार प्रचंड मतानी विजयी होतील असे वक्तव्य बीड मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी पाली,कपिलधारवाडी, हिंगणी खु., पालसिंगण आदी गावामध्ये भेटी देवून प्रचार रॅली प्रसंगी व्यक्त केले.
बीड तालुक्यातील सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने निर्णायक आघाडी घेतली असून या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी बालाघाटावरील गाांची झंझावती दौरा केला. या प्रसंगी अनेक ठिकाणी गावातुन रॅली काढुन व सभा घेवून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या रॅलीत हजारोच्या संख्येने ग्रामस्थ तथा युवक, माता भगिनी उपस्थित होत्या. या आधीच बीड मतदार संघातील रूई शहाजानपुर, बोरखेड, आहेर चिंचोली या ग्रामपंचायतचे सरपंच बिनविरोध निवडून आणून आ.संदीप भैय्या क्षीरसागरांनी विजयाची हॅट्रीक केली असून बीड मतदार संघातील उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली असून पाली/कपिलधारवाडी येथील ग्रामस्थपण यंदा परिवर्तन घडवुन आणणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ.मंजुषा शैलेंद्र नवले, सौ.निर्मला मधुकर साळुंके, सौ.निर्मला रामदास नवले, सौ.सुनंदा दत्तात्रय साळुंके, सौ.शेख सुलताना शिकुर, सौ.शेख हानिफा शेख बाबुु, सौ.दैवशाला वसंत वीर, सौ.सुरेखा रामहरी धनवडे, श्री.शिवप्रताप श्रीकांत नवले, श्री.डॉ.दत्तात्रय त्रिंबक साळुंके, श्री.संदीपनाना सखाराम नवले, श्री.रूद्रसेन आश्रुबा महाकळे, अॅड.पोपट पिराजी वीर यांना प्रचंड बहुमताने विजयी करून परिवर्तन घडवणार असे आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे.








