राहुरी येथील अग्नीवीर सैनिक भरतीचे निकाल जाहीर

Beed

राहुरी येथील अग्नीवीर सैनिक भरतीचे निकाल जाहीर

बीड/वार्ताहर

दि. 15:-भारतीय सैन्य दलाच्या मार्फत अग्नीवीर सैनिक भरतीचे 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत राहुरी जिल्हा अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले होते या सैन्य भरती प्रक्रियेचे निकाल क्लर्क आणि एस के टी वगळून ऑल ट्रेड साठी 31 ऑक्टोबर 2022 आणि क्लर्क आणि एस के टी पदांचे 2 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहेत, भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना पाहण्यासाठी सदर निकाल भारतीय सैन्य दलाच्या जॉईन इंडियन आर्मी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

 

          या निकालाद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस, हेडक्वार्टर रिक्रुटींग झोन पुणे पिनकोड-900449. येथे आवश्यक कागदपत्रांसह 26 नोव्हेंबर 2022 या अंतिम दिनांक पर्यंत उपस्थित राहणे गरजेचे आहे असे हेडक्वार्टर रिक्रुटींग ऑफिस झोन पुणेचे कर्नल मनीष कार्की यांनी कळविले आहे.

Sharing

Visitor Counter