पीक स्पर्धेसाठी शेतक-यांनी अज सादर करण्याचे आवाहन

Beed

पीक स्पर्धेसाठी शेतक-यांनी अज सादर करण्याचे आवाहन

बीड/वार्ताहर

तृणधान्य कडधान्य व गळीतधान्य पिके सन 2022-23 रब्बी हंगाम पीक स्पर्धा अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढविण्याकरता शेतकऱ्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यात पीक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून चालू वर्षात रब्बी हंगाम 2022 मध्ये राज्यातील रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवसआणि तीळ या प्रमुख पिकांच्या पीकस्पर्धा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय या दोन स्तरावर प्रथमच राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने अन्नधान्य पिके व गळीतधान्य पिके अंतर्गत जिल्ह्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज सादर करण्याचे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.एम.साळवे, बीड यांनी केले आहे.

 

        पीक स्पर्धेत बक्षिसाचे स्वरूप जिल्हा पातळीवर प्रथम विजेत्या स्पर्धकास रुपये 10 हजार, द्वितीय विजेते स्पर्धकास रुपये 70 हजार, तृतीय विजेते स्पर्धकास रुपये 5 हजार व तालुका स्तरावर प्रथम विजेते स्पर्धकास रुपये 5 हजार, द्वितीय विजेते स्पर्धकास रुपये 3 हजार, तृतीय विजेते स्पर्धकास रुपये 2 हजार असे बक्षिसाचे स्वरूप आहे. सदर पिकस्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील पीक स्पर्धेत अर्ज सादर करून आपला सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रति अर्ज रुपये.300/- एवढे शुल्क लागू राहील. एक शेतकरी एका पेक्षा अधिक पिकासाठी अर्ज करून स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. ज्या पिकासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करावयाचे आहेत, त्या पिकाखालील क्षेत्र कमीत कमी 40 आर वर सलग लागवड असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेताना शेतकऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असली पाहिजे व ती जमीन स्वतः कसत असला पाहिजे. तालुका पातळीवरील पिकस्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांना भाग घेता येईल. मात्र जिल्हा पातळीवरील स्पर्धेत यापूर्वी कधीही तालुकास्तरावरील स्पर्धेत प्रथम तीन आलेले शेतकरी पात्र राहतील. अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्रातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करून अंतिम तारखेपूर्वी पिक स्पर्धेचा अर्ज शुल्कासहित सादर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा.

 

                                                           

Sharing

Visitor Counter