बीडच्या मातीत यशस्वी होण्याचा 'जुनून' !

बीडच्या मातीत यशस्वी होण्याचा 'जुनून' !
मार्गदर्शन : बार्टी केंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना रामराव ईढोळे यांचे प्रतिपादन
बीड / प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना, विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. कोणतेही यश माणसाला कधीच सहजासहजी मिळत नाही. विद्यार्थांनो बीडचा इतिहास मोठा असून आदर्शवत आहे. एवढेच नव्हे तर बीडच्या पावन भूमीत यशस्वी होण्याचा जुनून आहे.असं प्रतिपादन परभणी, ता. जिंतूरचे विस्तार अधिकारी रामराव ईढोळे यांनी व्यक्त केले.
बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे बुधवार (ता.१४) रोजी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विस्तार अधिकारी रामराव ईढोळे बोलत होते. यावेळी सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते रंजित इनकर, ग्रामसेवक ज्ञानेश्वर राठोड, सूर्यकांत सावंत, एलआयसी प्रतिनिधी सानप, ग्रामसेवक संजयकमार भवाळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना रामराव ईढोळे म्हणाले की, बीड सारख्या ठिकाणी राहुल वाघमारे यांनी एक अतिशय दर्जेदार केंद्र उभारुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बार्टीच्या माध्यमातून एक नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रातून आगामी काळात अनेक विद्याथी घडतील. विद्यार्थांनी या संधीचे सोने करुन आपले करिअर घडवावे. असे मत विस्तार अधिकारी रामराव ईढोळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. भरत खेत्रे, प्रस्ताविक व आभार प्रा.अमोल क्षीरसागर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे, ग्रंथपाल सचिन काकडे, सहाय्यक प्रा.अर्चना आठवले,वरिष्ठ लिपिक विनोद जोगदंड, कनिष्ठ लिपिक दिलीप गायकवाड, व्हिडीओ ग्राफर राहुल शिंदे, सहाय्यक दीपक वाघमारे,सहाय्यक गजानन खेत्रे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.








