राबिया बसरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड आणि मोमीन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र चा पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

Beed

राबिया बसरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड आणि मोमीन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र चा पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

बीड/प्रतिनिधी

येथील राबिया बसरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड आणि मोमीन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र चा भारतरत्न राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार वितरण सोहळा शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थाटात संपन्न झाला.

              विविध क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्याने भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे राबीया बसरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड आणि मोमीन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, समाजात शैक्षणिक, सामाजिक, राजकिय, वैद्यकिय, औद्योगिक, क्रिडा व विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे राष्ट्र व राज्य स्तरीय भारतरत्न राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम या नावाने पुरस्कार वितरण केले जाते. यावेळी ही दि.११ डिसेंबर २०२२ रविवार रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे प्राध्यापक तथा माजी आमदार सुनिल सुर्यभान धांडे, गोल्ड मेडलिस्ट डॉ. इजहार जावीद अपेक्स बालरूग्णालय, बीड, डॉ. एम. ए. वहिद (न्युरो फिजीशियन) औरंगाबाद, (प्राचार्य) सिद्दीकी नवीद (नॅशनल उर्दू ज्युनियर कॉलेज, बीड यांच्या (मार्गदर्शनाखाली) व डॉ. अनिल बी. सानप (लाईफ लाईन हॉस्पिटल, बीड), अब्दुल खालेख (सचिव) मोमीन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र व तसेच अॅड. वाजेद मोमीन (अध्यक्ष) मोमीन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र व मोहम्मद सादेक (जिल्हाध्यक्ष) ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स व खाजा अजीमोद्दीन (उपाध्यक्ष) आर. बी. बी. एस. एस. बीड व तसेच मोहम्मद जहिरोद्दीन (गुत्तेदार, परभणी), मोमीन सर्फराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य-दिव्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात राजकिय क्षेत्रात (प्रा. सुनिल धांडे, माजी आमदार, बीड.) चा पाहुण्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. सारिका क्षीरसागर(स्त्री रोग तज्ञ), डॉ. इज़हार जावीद (बालरोग तज्ञ), डॉ. एम. ए. वहिद (न्युरोलॉजी) यांचा सत्कार करण्यात आला.

अभियंता क्षेत्रात संगणक क्षेत्रात पि.एच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. आदित्य सुभाषचंद्र सारडा, इंजि. मोमीन इरफान चा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात - कार्यक्रमाचे (मार्गदर्शक) तथा (प्राचार्य, नॅशनल उर्दू ज्युनियर कॉलेज, बीड) डॉ. हिमांशु श्रीवास्तव (उपप्राचार्य) आदित्य दंत महाविद्यालय, बीड व मा, उमेर सलिम, मिल्लत ग्रुप, प्रा. सय्यद तारेख, क्रिडा क्षेत्रात शेख जहीर अमीर, शशिकांत कुलथे यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात सय्यद नजीर सय्यद वजिर, जगदीश फुलचंद गुरखुदे यांना पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यत आला. युवा उद्योजग पुरस्कार शेख इमरान हमीद मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सिद्दीकी नवीद यांनी लिहिलेली (पुस्तक मुझे बनाना है UPSC टॉपर) पाहुण्यांना भेट देण्यात आली. यानंतर कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

Sharing

Visitor Counter