संपादक बालासाहेब फड यांची स्व.सुंदराबाई मुरलीधर आंधळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड.

संपादक बालासाहेब फड यांची स्व.सुंदराबाई मुरलीधर आंधळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
परळी/प्रतिनिधी
रेणुकामाता कुलदैवत असणाऱ्या व नात सांप्रदायातील संत अवजीनाथ महाराज सद्गुरू वामनभाऊ महाराज, राष्ट्रसंत भगवानबाबा व स्व गोपीनाथराव मुंडे साहेब राजकीय दैवत असलेल्या वंजारी समाजातील साहित्य संमेलना निमित्ताने यंदा स्व.सुदराबाई मुरलीधर आंधळे स्मृती प्रित्यर्थ स्व. सुंदराबाई मुरलीधा आंधळे पुरस्कार 2022 देऊन दैनिक सोमेश्वर साथीचे मुख्य संपादक बालासाहेब फड यांना गौरविण्यात येणार आहे. फड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे रावसाहेब थोरात सभागृह गंगापुर रोड नाशिक दि २५/१२/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. संपादक बालासाहेब फड यांची राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.








