भगवानगडचे विद्यार्थी सुधाकर शास्त्रींना डॉक्टरेट

Beed

भगवानगडचे विद्यार्थी सुधाकर शास्त्रींना डॉक्टरेट

महंत नामदेव शास्त्रींनी केला सत्कार

बीड/प्रतिनिधी

श्री क्षेत्र भगवानगड येथे शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील सुधाकर कारभारी सानप महाराज यांनी श्रीमद्भागवत आणि ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्ण ः तुलनात्मक अभ्यास या विषयावरील प्रबंध सादर केला होता. याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने त्यांनी डॉक्टरेट प्रदान केली. याबद्दल गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी सुधाकर सानप यांचा सत्कार केला.

संत श्री भगवानबाबा यांनी अध्यात्माबरोबरच शिक्षणविषयक जनजागृती केली. गडाच्या पायाभरणीबरोबरच त्यांनी महाविद्यालयातून विद्यादानही सुरु केले होते. ‘एकर विका, पण मुलांना शिकवा' हा संदेश ते आपल्या कीर्तन, प्रवचनातून गावोगावी देत असत. त्यांच्या विचारांचा वारसा भगवानगडावरुन पुढे चालवला जात आहे. भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात आजही शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातीलच सुधाकर कारभारारी सानप शास्त्री यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता. त्यांना नुकतीच विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली. सुधाकर सानप हे सध्या पैठण येथे भगवानगडाच्या संस्थानचे काम पाहत आहेत. गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी सानप यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Sharing

Visitor Counter