प्रमुख न्यायाधीश मा. महाजन साहेब यांच्या हस्ते बीड जिल्हा वकील क्रिकेट सराव शिबिराचे उद्घाटन

प्रमुख न्यायाधीश मा. महाजन साहेब यांच्या हस्ते बीड जिल्हा वकील क्रिकेट सराव शिबिराचे उद्घाटन
बीड/प्रतिनिधी
आज दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बीड (स्टेडियम) येथे औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वकील क्रिकेट स्पर्धा 2022 निमित्त बीड जिल्हा वकील क्रिकेट संघाचा सराव शिबिराच्या, उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन बीड जिल्हा क्रिकेट संघ यांच्या वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. महाजन साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न्यायाधीश मा. बागल साहेब, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शहाजी नन्नवरे साहेब, उपाध्यक्ष अॅड. राहुल साळवे साहेब, कोषाध्यक्ष अॅड. रणजीत सोनवणे, अॅड.विजय पंडित साहेब, अॅड.आर डी. येवले साहेब, सय्यद अझर सर, संजय धस, हे होते, या वेळी कर्णधार अॅड. अविनाश गडगे उपकर्णधार अॅड. सय्यद साजेद, अॅड. राहुल वाडमारे, अॅड. श्रीकांत जाधव, अॅड. रंजीत वाघमारे अॅड. पोपळे, अॅड. सचिन काळकुटे, अॅड. संजय चव्हाण, अॅड. आशिष ललवाणी, अॅड. जाहीर पठाण, तसेच बीड जिल्हा वकील संघ क्रिकेट टीम व बीड जिल्हा वकील संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते








