सामाजिक न्याय पर्वाच्या अनुषंगाने महाविद्यालयात विशेष शिबिर

सामाजिक न्याय पर्वाच्या अनुषंगाने महाविद्यालयात विशेष शिबिर
बीड/वार्ताहर
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाने दि. 26 नोव्हेंबर 2022 ते 6 डिसेंबर 2022 या कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त ज्या 11 वी, 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत दि. 5 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत तालुकानिहाय महाविद्यालयत समितीचे कर्मचारी उपस्थित राहणार असून महाविद्यालयातील प्राचार्य / प्रतिनिधी मार्फत तालुक्यात इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून विद्यार्थी वंचित राहू नये याची दक्षता संबंधित महाविद्यालयाने घ्यावी.
समितीचे कर्मचारी नमूद तारखेस पुढीलप्रमाणे महाविद्यालयात उपस्थित राहणार आहेत. अंबाजोगाई तालुक्यासाठी दि. 5 डिसेंबर 2022, रोजी योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई.बीड तालुक्यासाठी दि. 6 डिसेंबर 2022 रोजी बंकट स्वामी महाविद्यालय बीड. केज व धारूर तालुक्यासाठी दि. 7 डिसेंबर 2022 रोजी वसंत महाविद्यालय केज.बीड व गेवराई तालुक्यासाठी दि. 8 डिसेंबर 2022 रोजी बंकट स्वामी महाविद्यालय बीड.वडवणी तालुक्यासाठी दि. 9 डिसेंबर 2022 रोजी स्वामी विवेकानंद माध्य. व उच्च माध्य. विद्यालय वडवणी.
येथे नमूद कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष शिबीर राबविण्यात येत असून संबंधित तालुक्यातील महाविद्यालयांनी या विशेष शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.








