जिल्हा परिषदे समोर एका अज्ञाताची गळफास घेऊन आत्महत्या

Beed

जिल्हा परिषदे समोर एका अज्ञाताची गळफास घेऊन आत्महत्या

बीड/प्रतिनिधी 

दि.05 आज रात्री दहा ते अकराच्या दरम्यान एका तरुणाने हॉटेलच्या अडूला दोरी बांधून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्हा परिषदेच्या कंपाउंड वाल मध्ये घडली. या आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असून आत्महत्या की हत्या ? हे पीएम नंतर लक्षात येईल, परंतु जिल्ह्यामध्ये काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा मृत्यू झाला होता तर आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणासमोरील भिंती लगत असलेल्या एका अडूला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला त्यामुळे बीड जिल्हा परिषद प्रशासनाची देखील चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्य शासकीय कार्यालय समोर आत्महत्या होते कशी? याला जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे याचा तपास होणे गरजेचे आहे.आत्महत्येमुळे उलट सुलट चर्चेला उधाण आला असून आत्महत्या कोणत्या कारणामुळे झाली हे समजू शकले नाही.मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही अशी सूत्रांकडून खात्रीलायक माहिती सांगण्यात येत आहे आत्महत्याग्रस्त तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी आणला आहे.

Sharing

Visitor Counter