महेबूब पठाण यांची लोकसेवा प्रेरणादायी-उत्तम सोनकांबळे

महेबूब पठाण यांची लोकसेवा प्रेरणादायी-उत्तम सोनकांबळे
बीड जिल्हा कोषागार कार्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त सेवागौरव
प्रतिनिधी/बीड
दि.3 : कार्यतत्पर असलेले महेबूब पठाण यांनी केलेली सेवा ही नवीन कर्मचार्यासाठी आदर्श आहे. त्यांच्या सेवेतून सहकार्यांना प्रेरणा मिळणार आहे, असे गौरवोद्गार औरंगाबाद विभागाचे लेखा व कोषागारे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांनी काढले.
येथील जिल्हा कोषागार कार्यालयातून मुद्रांक प्रमुख लिपीक महेबूब उर्फ लाला पठाण हे दि.30 नोव्हेंबर रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल कोषागार कर्मचारी संघटनेच्यावतीने कार्यालयात गुरुवारी (दि.1) त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी प्रमुख अतिर्थी म्हणून सोनकांबळे हे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी दिलीप झिरपे, जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, कोषागार कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बालाजी परेदशी, पोपट साळवे, राजेंद्र जोरे, जाधव, पवार, डाके व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कनिष्ठ लेखापाल राहुल धोंगडे यांनी केले. सत्काराबद्दल पठाण दाम्पत्याने आभार मानले.
सहसंचालकांनी लावली हजेरी
औरंगाबाद विभागाचे लेखा व कोषागारे सहसंचालक उत्तम सोनकांबळे हे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. यावेळी त्यांना पठाण यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवा गौरव कार्यक्रमाबद्दल माहिती मिळताच त्यांनी आवर्जून हजेरी लावत पठाण दाम्पत्याचा सत्कार केला.








