आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निरीक्षकपदी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती

Beed

आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निरीक्षकपदी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती

आष्टी/प्रतिनिधी 

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुलभ,पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत आष्टी ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक म्हणून अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी निरीक्षक अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील.त्या अनुषंगाने आष्टी तालुका निवडणूक निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सुनिल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी म्हणून तथा तहसीलदार विनोद गुंडमवार हे काम पहात आहेत.

Sharing

Visitor Counter