जिल्हाप्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी;लोकशाहीचा खुनच!

Beed

जिल्हाप्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी;लोकशाहीचा खुनच!

बीड/वार्ताहर 

आज दिनांक.४ डिसेंबर वार रविवार रोजी सकाळी ८ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलाच्या न्याय मागण्यासाठी गेल्या २५ वर्षापासून संघर्ष करणा-या पारधी समाजातील आप्पाराव पवार यांचा जिल्हाप्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बळी गेला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या माणसाचा मृत्यु म्हणजेच जिल्हाप्रशासनाने लोकशाहीचा केलेला खुनच आहे. 

घरासाठी पूर्वीपासूनच संघर्ष 

   पारधी समाजातील लोकांचा अगोदर ४० वर्षापासून रहात असलेल्या जागेसाठी संघर्ष त्यानंतर घरकुल मिळण्यासाठी संघर्ष त्यानंतर घरकुलाचे हफ्ते मिळवण्यासाठी व त्यानंतर अर्धवट बांधकाम पुर्ण करण्यासाठीचा संघर्ष .

पारधी समाजासाठीचे निर्णय धनदांडग्यांसाठी का नाही???जिल्हाप्रशासनाची बोटचेपेपणाची भुमिका; कागदी घोडे नाचवून अडवणुक 

पारधी समाजातील लोकांना शासनाचा जीआर दाखवणारे जिल्हाप्रशासन ईतर राजकीय पुढारी,भुमाफियांवर मात्र मेहेरबान दिसून येते. घरकुल मागणा-या पारधी समाजातील अडानी लोकांना मात्र कागदीघोडे नाचवून अडवणुक करतंय.

उद्या १२ वाजता निर्णय घेण्याच्या लेखी आश्वासनानंतर प्रेत हलवले 

मयत आप्पाराव पवार यांनी ज्या घरकुलाच्या मागणीसाठी जीव दिला त्या मागण्या पुर्ण झाल्याशिवाय प्रेत हलवणार नाही असा पवित्रा घेतल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,शिवाजीनगर पोलीस स्टेशन निरीक्षक केशव राठोड यांच्या उद्या दि.५ डिसेंबर सोमवार रोजी दुपारी १२ वाजता संबधित आधिका-यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर  प्रेत हलवण्याची परवानगी देण्यात आली. 

Sharing

Visitor Counter