दुःखाचा काळोख 'अजून उजाडत' नाही !

Beed

दुःखाचा काळोख 'अजून उजाडत' नाही !

नाट्य स्पर्धा : एकापेक्षा एक नाटकांची रसिकांना मेजवानी

बीड / प्रतिनिधी

येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरु आहे.या स्पर्धेत शुक्रवार (दि.२) रोजी अजून उजाडत नाही हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वोदय शिक्षण कला अकादमी, परळी या संस्थेने सदरील नाटक सादर केले. प्रसिद्ध लेखक सुरेश गोसावी लिखित व दिग्दर्शक अरुण सरवदे यांनी अजून उजाडत नाही या नाटकातून स्मशानभूमीत जीवन जगणाऱ्या कुटूंबाची कहाणी आणि त्यांच्या वाट्याला आलेली संकटे व भोवतालच्या घटना अगदी उत्तमरीत्या मांडून रसिकांची मने जिंकली आहेत.

     महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाणे बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शुक्रवार (दि.२) डिसेंबर रोजी सादर झालेले अजून उजाडत नाही या नाटकाला रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘अजून उजाडत नाही’ हे नाटक एका विचित्र परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कुटूंबाची हळवी गोष्ट सांगतं. अजून उजाडत नाही हे नाटक मूल्य तडजोडीच्या संघर्षाबद्दल बोलणारं नाटक आहे, नाटकाचा खरा जीव हा रोमँटिक जरी असला पण एका महत्वाच्या विषयावर भाष्य करणारे नाटक आहे. त्यातली अधुरेपणाची हुरहूर, परिस्थितीच्या बेचक्यात सापडलेल्या माणसांची अगतिकता आणि एकमेकांपासून दुरावण्यातली कासाविशी हे नाटक उत्तमपणे पकडतं. लेखक योगेश सोमणने कथेचं नाटकात रूपांतर करताना त्यातले भावनात्मक ताण उत्तम हेरले आहेत. या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे. अशी माहिती बीड केंद्राचे समन्वयक मुकूंद धुताडमल यांनी दिली.

Sharing

Visitor Counter