रेवकी गटाच्या आरोग्याची नेहमीच काळजी

Beed

रेवकी गटाच्या आरोग्याची नेहमीच काळजी

रणवीर पंडित : बीएम प्रतिष्ठानकडून राबले विविध उपक्रम

बीड/प्रतिनिधी

जिल्हा परिषदचे सभापती तथा बी.एम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित आलेले आहेत. त्या अनुषंगाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेवराई तालुक्यातील रेवकी सर्कलमध्ये तब्ब्ल अकरा दिवस मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती बाळासाहेब मस्के नेहमीच रेवकी गटाच्या आरोग्याची काळजी घेतांना दिसून येतात. एवढेच नव्हे तर त्यांनी रेवकी सर्कलमधील गावांना आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असे प्रतिपादन युवा नेते रणवीर पंडित यांनी व्यक्त केले.

         बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित बीएम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकपर भाषणात माजी सभापती बाळासाहेब भाऊ मस्के यांनी शिबीर आयोजित करण्यामागची भुमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सामाजिक कार्यात सदैव पुढे असणा-या अमरसिंह पंडित आणि त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले तसेच बी.एम प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुर्वी केलेल्या कार्याची पण माहिती दिली. त्यांनी शिबिरात होणा-या तपासणींची माहिती देऊन कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. याप्रसंगी डॉ रचना शेळके,अरविंद सौंदलकर सर, माजी सरपंच रोहिदास सौंदलकर,कमलाजी यमगर,जीवन जाधव,बाबुराव चोरमले, चेअरमन संतोष टेहळे,भाऊसाहेब नरोटे,भारत कोळेकर, सतीश चोरमले, सुरेश धोत्रे,नामदेव सौंदलकर,गजानन खताळ, बबन बनगर, अशोक खताळ,बाळू चोरमले,कृष्णा सौंदलकर, भारत थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला व पुरुष रुग्ण,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ चोरमले यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.

अमरसिंह पंडितांच्या मार्गदर्शनाखाली

बीड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त रेवकी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न अकरा दिवसीय शिबिरामध्ये एकूण 3300 नागरिकांनी आपली नेत्र तपासणी केली नेत्र तपासणी केल्यानंतर 468 नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पात्र ठरवले आहे येत्या 14 डिसेंबर पासून एकूण 30 जणांचा गट करून त्यांना पुणे येथील एच व्ही देसाई हॉस्पिटल येथे त्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Sharing

Visitor Counter