सी.ओंची तत्परता बॅनरचा त्रास वाटला बोगस बांधकामाचा काय?

सी.ओंची तत्परता बॅनरचा त्रास वाटला बोगस बांधकामाचा काय?
बीड/वार्ताहर
शिवाजी चौकातील अनाधिकृत लावलेल्या बॅनर सीओ साहेबांनी तात्काळ काढण्याच्या सूचना दिल्या कदाचित या बॅनरमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती परंतु भाजी मंडईतील महिला बेघर निवाऱ्याचे बांधकाम बोगसरीत्या चालू असून या ठिकाणी दुर्घटना होऊ शकत नाही का? दुर्घटना झाली तर जिम्मेदार कोण असणार? सी. ओ साहेबांना या बांधकामाचा गांभीर्य नाही का?असे प्रश्न उपस्थित केले जात असून सी.ओंची तत्परता बॅनरचा त्रास कमी करण्यास दिसली मात्र बोगस बांधकामाचा काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवाजी चौकातील लावलेले बॅनर काही आरोग्य शिबिराचे तर काही कार्यक्रमाचे होते यामुळे कदाचित दुर्घटना होण्याची शक्यता होती मात्र अनेक लोकांना फायदा नाकारता ही येत नाही बॅनर काढले ही चांगलीच गोष्ट मात्र भाजी मंडईतील महिला बेघर निवार्याचे बांधकाम दर्जाहीन बोगस होत असल्याचे बातम्या अनेक वृत्तपत्राने प्रकाशित करून ही सी.ओ साहेबांनी गुत्तेदारावर का कारवाई केली नाही? हे प्रश्न निर्माण होतो. यावरून लक्षात हे येतो की गुत्तेदार सी.ओ साहेबांच्या खूप जवळचा माणूस असून त्याने दर्जाहीन बांधकाम केलं तरी सी.ओ साहेबांना तो बांधकाम चांगलाच वाटेल.
नगरपालिकेच्या देखरेखी खाली होत असलेल्या या कामाकडे मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाचेही लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो केवळ गुत्तेदारासाठी ही इमारत उभी करायची आहे की बे सहारा बेघर गरीबांसाठी हा प्रश्न उपस्थित होतो जर गुत्तेदारांवर मुख्याधिकारी किंवा नगरपालिका प्रशासनाचे जास्तीचे प्रेम असेल तर त्यांनी आपल्या खिशातून काही रक्कम गुत्तेदाराला भेट म्हणून द्यावी आणि आपलं प्रेम व्यक्त करावं परंतु गोरगरिबांच्या निवाऱ्यासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर व्हावा नसता नगरपालिकेने बे सहारा लोकांनाही सोडले नाही असाच त्याचा अर्थ निघेल जशी तत्परता बॅनर काढण्यासाठी सी.ओ साहेबांनी दाखवली तशीच तत्परता या बांधकामाविषयी दाखवावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.








