४ डिसेंबरला बीड ते नारायणगड पायी दिंडी सोहळ्यास उपस्थित रहावे- ह.भ.प. सचिन महाराज सपकाळ

४ डिसेंबरला बीड ते नारायणगड पायी दिंडी सोहळ्यास उपस्थित रहावे- ह.भ.प. सचिन महाराज सपकाळ
बीड/प्रतिनिधी
आषाढी एकादशी पासून बीड ते श्री क्षेत्र नारायणगड पायी दिंडी सोहळा सुरू केला असून या महिन्यात दि.४ डिसेंबर रविवार रोजी बीड ते श्री क्षेत्र नारायणगड पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले असून भागवताचार्य सचिनजी महाराज सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. ही पायी दिंडी भागवताचार्य सचिनजी महाराज सपकाळ यांच्या खडकपूरा पेठ बीड येथील राधेश्याम संगीत विद्यालय निवासस्थानापासून सुरू होणार आहे व पुढे यशवंत नगर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणपतीची आरती करून ही दिंडी अंबिका चौक माऊली नगर येथुन खापर पांगरी जवळील ओंकारेश्वर मंदिर, खापर पांगरी, उमरद- तांदळवाडी, केतुरा मार्गे नारायण गड येथे पोहचणार आहे. त्यामुळे सध्याच्या धावपळीच्या युगात एक दिवस मोबाईल मुक्त होऊन शारीरिक मानसिक तनाव मुक्त होऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहून पायी चालत वारकऱ्यांच्या सुसंगतीत टाळ मृदुंग ढोल ताशाच्या गजरात रममाण होण्यासाठी बीड ते नारायणगड पायी दिंडी सोहळ्यास उपस्थित रहावे या वेळेच्या एकादशीला रविवार सुट्टीचा दिवस असून या पुर्वी जे भाविक सरकारी- खाजगी नौकरीला असल्याने या दिंडीत येऊ शकले नव्हते त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.त्यामुळे यावेळी सर्व नौकर कर्मचारी, सर्व सामान्य भाविक भक्तांनी बीड ते श्री क्षेत्र नारायणगड पायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती युवा भागवताचार्य सचिनजी महाराज सपकाळ यांनी केली आहे.








