सामाजिक समता अभियानच्या वतीने वडवणी येथे संविधान गौरव परिषद

सामाजिक समता अभियानच्या वतीने वडवणी येथे संविधान गौरव परिषद
स्वातंत्र्य, बंधुता, न्याय व हक्क कर्तव्याची जाणीव होण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा - प्रा.शशिकांत जावळे
बीड/प्रतिनिधी
दि.01 भारताची लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी तसेच समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय , हक्क व कर्तव्याची जाणीव होण्यासाठी सामाजिक समता अभियानच्या वतीने तालुका वडवणी येथे रविवार दि. 04 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता नागवंशी बुध्द विहार येथे संविधान गौरव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक समता अभियानचे महासचिव प्रा.शशिकांत जावळे यांनी केले आहे.
सामाजिक समता अभियान आयोजित संविधान गौरव या परिषदेचे उद्घाटक उपशिक्षणाधिकारी मा. नानाभाऊ हजारे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. व्याख्याते डॉ.शुध्दोधन कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. शशिकांत जावळे हे राहणार आहेत. तर प्रास्ताविक व परिषदेची भूमिका प्रा.डॉ. विठ्ठल जाधव हे मांडणार आहेत. परिषदेतील प्रथम सत्राचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.श्रीराम जाधव व आभार प्रा.ईश्वर डोंगरदिवे हे करणार आहेत.
तर दुपारी 1 ते 3 या वेळेत निमंत्रित कवींचे काव्य सत्र होणार आहे. या काव्यसंमेलन सत्राचे अध्यक्ष म्हणून ख्यातनाम कवी, शाहिर विलास सोनवणे राहणार आहेत . परिषदेच्या समारोप सत्रात एम.पी.लॉ कॉलेज औरंगाबादचे उपप्राचार्य प्रा.श्रीकिसन मोरे यांचे व्याख्यान होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक समता अभियानचे अध्यक्ष प्रविणकुमार डावरे हे असणार असून मराठवाडा अध्यक्ष प्रा. नारायण घोलप, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, प्रा.विनोद कीर्दक, प्रा.डॉ.नामदेव शिनगारे हे प्रमुख पाहुणे उपस्थित रहाणार आहेत.
या समारोप सत्राचे सुत्रसंचलन प्रा.आत्माराम झिंजुर्डे, आभार प्रा. संजय सावते हे करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमास वडवणी पत्रकार परिषद व पत्रकार संघ व सर्व पत्रकार बांधव तसेच वडवणी येथील मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभणार आहे. परिषदेची सुरुवात संविधान जलसाने सकाळी 10 वाजता होणार आहे. या जलसाचे सादरीकरण प्रमोद आर. निकाळजे आणि संचच्यावतीने करण्यात येणार आहे.
सामाजिक समता अभियान आयोजित या संविधान गौरव परिषदेस जिल्ह्यातील व वडवणी तालुक्यातील बहुसंख्य नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.शशिकांत जावळे, भारतीय बौद्ध महासभेचे प्रकाश खळगे सर , बाबासाहेब साळवे, लक्ष्मण वाघमारे सर, प्रा.ईश्वर डोंगरदिवे , प्रा डॉ विठ्ठल जाधव चरणराज ढोकणे ,बाळासाहेब गव्हाणे , प्रा. नारायण घोलप , प्रा आत्माराम झिंजुर्डे , भैय्यासाहेब तांगडे, सतिष वाघमारे आदींनी केले आहे.
