शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढीच खते व बी-बियाणे खरेदी करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढीच खते व बी-बियाणे खरेदी करण्याचे आवाहन
बीड/प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी अनावश्यक व जास्तीची रासायनिक खते खरेदी न करता आवश्यक तेवढेच खाते खरेदी करावे . खरीप हंगाम सन 2020 ला सुरुवात झाली असून बाजारपेठेत कृषी सेवा केंद्रावर विविध प्रकारचे बियाणे तसेच विविध रासायनिक खते उत्पादनाचे सर्व प्रकारचे रासायनिक खतांची ग्रेडचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झालेला असून शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करत आहेत.
कृषी सेवा केंद्रावर मुबलक प्रमाणात खते उपलब्ध असून यापुढे देखील खतांचा व बियाणांचा नियमित पुरवठा होणार आहे.
कोरोना (covid-19 )मुळे शेतकर्यात कृषी निविष्ठा केंद्रे बंद होतील किंवा उपलब्धतेबाबत साशंकता निर्माण होऊन काही शेतकरी पुढे आवक होईल किंवा नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक खते खरेदी करत आहेत.
शेतकऱ्यांनी अनावश्यक व जास्तीची रासायनिक खते खरेदी न करता आवश्यक तेवढेच खाते खरेदी करून प्रशासनास सहकार्य करावे शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने बियाणे रासायनिक खते विक्री होत असल्यास किंवा खतांची लिंकिंग होत असल्यास तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हास्तरीय कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकार एस. एम .साळवे यांनी केले आहे.








