बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Beed

बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

आदर्श महिला पत्रकार गितांजली‌ लव्हाळे‌ राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने सन्मानित

वडवणी/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये विशेष: ता सामाजिक क्षेत्रात राज्यात नामांकित असलेल्या झिल कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन शाबासकीची थाप देत असते.या वर्षीही ही परंपरा कायम जोपासून राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झालेल्या व्यक्तींना 26/11 संविधान दिनी पुणे येथे हा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील पत्रकारीता तथा संगीत क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महीला पत्रकार गितांजली लव्हाळे ह्या या वर्षीच्या मानकरी ठरल्या आहेत. लव्हाळे यांनी आजपर्यंत विद्यार्थी, वंचित , उपेक्षित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.ज्या ज्या वेळी महिला भगिनींना कायदेशीर अडचणीत येतात तेव्हा त्यांना मोफत सल्ला देण्याचे काम महिला दक्षता समिती च्या माध्यमातून करून मोठा दिलासा देण्याचे कर्तव्य पार पाडत असतात.पत्रकारिता अन् विशेष म्हणजे ग्रामीण भागात करणे ही तारेवर ची कसरत असतांनाही अल्पवधित स्वतः च्या कर्तत्वानी सिद्ध करून दाखविले.या सर्व बाबीची दखल घेऊन पुणे येथील झिल कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन मार्फत राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार करिता विशेष निवड केली. त्यांच्या या अतुलनीय सामाजिक कामगिरी मुळे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. यावेळी पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रमुख, डॉ. सुधीरत ठरे श्री. आर. के. गायकवाड . डॉ. सुषमा सरावस सी .ई.ओ .ओयासिस ग्रुप नवी दिल्ली. डॉ.कविता राव. डॉ. एन. एय पठाण यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख डॉ. प्रमिला तलवाडकर , गणेश पुंडे ,झील कांता इंटरनॅशनल सोशल फाऊंडेशन व संविधान महोत्सव समिती - २२ कडुन देशभरातील महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आदी राज्यातील व्यक्तिंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात मराठवाड्यातील बीड/वडवणी येथील आदर्श पत्रकार गितांजली लव्हाळे वानखडे यांनी राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराचा‌ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंदाने स्वीकार केला. हा सोहळा २६ नोव्हेंबर २०२२ रोजी म्हणजे संविधान दिनी पत्रकार भवन, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. पत्रकार गितांजली‌ लव्हाळे‌ यांना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधव व समाज सेवक व सर्वसामान्यांनी अभिनंदन केले असून त्यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा‌ वर्षाव‌ होत‌ आहे.

Sharing

Visitor Counter