भारतीय संविधान दिन सर्व शाळा,महाविद्यालय,प्रशासकीय कार्यालय मध्ये 26 नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा होणार

Beed

भारतीय संविधान दिन सर्व शाळा,महाविद्यालय,प्रशासकीय कार्यालय मध्ये 26 नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा होणार

 वंचित बहुजन आघाडी च्या मागणीला यश 

 बीड/प्रतिनिधी

दि. 25 भारतीय संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयात साजरा केला जावा या मागणी ला यश आले आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना देण्यात आले होते त्याची दखल घेत . आज शाळा महाविद्यालय प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी हा दिवस मोठ्या उत्साहात उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात आले आहे,

ज्या भारतीय संविधाना वर संपूर्ण देश चालतो, या ठिकाणची न्यायव्यवस्था, शासन व्यवस्था, राज्य व्यवस्था, सुरळीतपणे चालू आहे हा देश अखंड स्वरूपात आज भारतीय संविधानामुळेच उभा आहे, म्हणून भारतीय संविधान दिन सार्वजनिक स्वरूपात व मोठा उत्सव स्वरूपात संपूर्ण जिल्ह्यातील शाळेत व महाविद्यालयात साजरा केला जावा भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले जावे संविधान प्रतीची मिरवणूक काढली जावी संविधान जनजागृती पर व्याख्याने घ्यावीत, शाळेतील मुलांना संविधानाचे महत्वपूर्ण पटवून सांगणारे उपक्रम कार्यक्रम राबवले, अशा मागणीचे निवेदन पत्र देण्यात आले होते याची दखल घेत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सर्व शाळा महाविद्यालय प्रशासकीय कार्यालय आदेशाचे पत्र काढले आहे.

 

  या मागणीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, ज्ञानेश्वर कवठेकर, युनुस शेख, बालाजी जगतकर अजय सरवदे, किरण वाघमारे मिलिंद सरपते,एड.राजेंद्र कोरडे, उमेश तुळवे,आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Sharing

Visitor Counter