शिक्षण घेत असतानाच अार्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी नाेकरी-व्यवसायचा शाेध गरजेचा : वाय जनार्दन राव

Beed

शिक्षण घेत असतानाच अार्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी नाेकरी-व्यवसायचा शाेध गरजेचा : वाय जनार्दन राव

बीड/ प्रतिनिधी

सामान्य कुटूंबामधील मुलगा असाे किंवा मुलगी दहावीची परीक्षा ही त्याच्या अायुष्यासाठी वळण देणारी परीक्षा असते. ही परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण हे दर्जेदार घेण्यासह स्वत:चे अार्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी नाेकरी किंवा व्यवासायाचा शाेध घेण्याची चिकित्सक वृत्ती निर्माण हाेणे अावश्यक अाहे. तरच पैशाचे अाणि वेळेचे महत्व समजण्यास प्रारंभ हाेताे अन‌् स्वत:चे करीअर कशामध्ये करण्याचे हे निवड बाैध्दीक क्षमतेचा विकास हाेताे, असे मत अन्वीता हाॅटेलचे सर्वेसर्वा वाय जनार्दन राव यांनी व्यक्त केले.

माय माईलस्टोन अकॅडमी फॉर स्पोकन इंग्लिशच्या सभागृहामध्ये गुरुवारी (दि. २४) विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास व करियर गायडन्स साठी मार्गदर्शनपर शिबिरामध्ये अध्यक्षस्थानी वाय जनाार्दन राव उपस्थित हाेते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रवी उबाळे, पत्रकार प्रतिक कांबळे, संचालक ज्ञानेश्वर तांबे, संस्थापक संचालक तांबे, प्राचार्य सारीका जगताप यांची उपस्थिती हाेती.

राव बाेलताना म्हणाले, प्रत्येक अाई-वडीलांची इच्छा अशीच असते की मला जे काही मिळाले नाही ते माझा मुलाला सर्वकाही मिळणे गरजेचे अाहे. तीच जाणीव मुलगा असाे किंवा मुलगी यांनी ठेवणे गरजेची अाहे. बाप कमाईचे पैसे खर्च करण्यासाठी हात सतत सरसावतात परंतु अाप कमाई सुरू झाल्यावर समजते की पैसा कुठे व किती अाणि केंव्हा खर्च करावा. यातून स्वत:चे उत्पन्न वाढीबराेबरच देशाच्या विकासात भर पडत असते. दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाबराेबरच व्यवसायिक शिक्षण हा अायुष्याच्या करीअरचा पायरा रचत असताे. नाेकरी वाईट नाही परंतु राेजगार देणारे बनले तर समाजासह देशाच्या विकासाला चालणा मिळते असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

पत्रकार उबाळे म्हणाले, जीवन जगताना प्रत्येक टप्प्यांवर मार्गदर्शकाची गरज असतेच. त्यामुळे मार्गदर्शकाकडून मिळणाऱ्या ज्ञानाचा सदुपयाेग स्वत:च्या करीअर निवडीसाठी करणे अावश्यक अाहे. प्रत्येक वेळा अापण काय करताे, त्यापेक्षा काळाची गरज काय अाहे हे शाेधकवृत्तीने तपासणे गरजेचे अाहे. इंग्रजी भाषा ही काळाची गरज अाहे. माध्यमे असाे वा इतर काेणत्याही क्षेत्रामध्ये इंग्रजी भाषेला अनन्य महत्व अाहे. ते ज्ञान शिकवण्यासाठी माय माईलस्टोन अकॅडमी हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी पाेषक अाहे.

पत्रकार कांबळे म्हणाले, जीवनाला कधी अाणि कुठून सुरूवात करायची हे याची प्रतिक्षा करण्यापेक्षा अापल्याला मिळाल्या प्रत्येक संधीचे साेने करण्यासाठी सिध्द हाेणं गरजेचे अाहे. ते करण्यासाठी स्वत:च्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी तन-मनाने प्रयत्न केल्यास धनाची नश्चितपणे प्राप्ती हाेते. अापण काेेणत्या कामाने सुरूवात केली त्यापेक्षा अाता अापण काय अाहाेत हे दाेन्ही स्थित्यांतर जीवनाला नवीन अायाम देत असतात. त्यामुळे काेणतेही काम लहान-माेठे नसते तर अापण किती अात्मीतेने करताे हे त्यावर अापला दर्जा निर्माण हाेत असताे असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

संचालक तांबे म्हणाले, माय माईलस्टोन अकॅडमी ही मागील चाैदा वर्षापासून बीड शहरामधील विद्यार्थीच नव्हे तर नाेकरदार, उद्याेजक, व्यापारी, गृहणींनीसह ज्यांना ज्यांना इंग्रजी बाेलण्याची अावड अाहे त्यांना प्रवेश देऊन घडवण्याचे कार्य करत अाहे. अाजपर्यंत अनेकांना इंग्रजी भाषेमध्ये बाेलण्याचे ज्ञानदानाचे कार्य करण्यात अामच्या टीमला यश प्राप्त झाले अाहे. येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी बाहेर गावी, इतर जिल्ह्यामधील अाहेत त्यांना इंग्रजी भाषा शिकण्यासाठी माय माईलस्टोन अकॅडमी अाॅनलाईनचे महाद्वार खुले करणार अाहे. त्यातुन अनेकांना संधी मिळणार अाहे. तसेच लहान मुलांसाठी अॅबकस क्लासेस अाणि प्रायमरी स्कुलही खुली करण्यात अालेली अाहे, बीडकरांसह पालक अाणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या खंबीर पाठबळावरच हे यश साध्य करता अाल्याचे त्यांनी भावना व्यक्त केल्या.

या शिबीरास विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्राज्वलानाने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत राहुल काळे दुसरा तसेच आकांक्षा काळे व सोहम चौरे - चॅम्पियनशिप मिळवल्या बद्दल गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन अमोल क्षीरसागर यांनी केले तर प्रास्तावीक संचालक तांबे यांनी केले तर अाभार प्राचार्य जगताप यांनी मानले.

Sharing

Visitor Counter