गितांजली लव्हाळे यांना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन च्या वतीने जाहीर

गितांजली लव्हाळे यांना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन च्या वतीने जाहीर
वडवणी/प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात राज्यात नामांकित असलेल्या झिल कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन ही संस्था गेल्या काही वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ता ला पुरस्कार देऊन शाबासकीची थाप देत असते.या वर्षीही ही परंपरा कायम जोपासून राज्य स्तरीय पुरस्कार घोषित झालेल्या व्यक्तींना संविधान दिनी सन्मान करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील वडवणी येथील पत्रकार तथा संगीत क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या सौ गीतांजली लव्हाळे ह्या या वर्षीच्या मानकरी ठरल्या आहेत. लव्हाळे यांनी आजपर्यंत केलेले वंचित , उपेक्षित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.ज्या ज्या वेळी महिला भगिनींना कायदेशीर अडचणीत येतात तेव्हा त्यांना मोफत सल्ला देण्याचे काम पोलिस दक्षता समिती च्या माध्यमातून करून मोठा दिलासा मिळवून दिला.पत्रकारिता अन् तीही ग्रामीण भागात करणे ही तारेवर ची कसरत असतांनाही आल्पवधित स्वतः च्या कर्तत्वानी सिद्ध करून दाखविले.या सर्व बाबीची दखल घेऊन झिल कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन मार्फत राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार साठी निवड केली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरी मुळे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मान्यवर मंडळी , डॉ. सुधीरत ठरे श्री. आर. के. गायकवाड . डॉ. सुषमा सरावस सी .ई.ओ .ओयासिस ग्रुप नवी दिल्ली. डॉ.कविता राव. डॉ. एन. एय पठाण . तसेच कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख डॉ. प्रमिला तलवाडकर ,झील कांता इंटरनॅशनल सोशल फाऊंडेशन व संविधान महोत्सव समिती - २२ कडुन तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र राज्यातील व्यक्तिंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात बीड जिल्ह्यातुन पत्रकार गितांजली लव्हाळे वानखडे . यांना पुरस्कार जाहिर झाला असुन याचा सोहळा २६ नोव्हेंबर २०२२ रोजी म्हणजे संविधान दिनी पत्रकार भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला असुन या सोहळ्यास समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थित रहावे असे आवाहन कवी . गणेश पुंडे यांनी केले आहे.








