राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित

Ashti

कोरोना महामारीमध्ये पक्षनिष्ठा सोडून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे - आ बाळासाहेब आजबे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित

आष्टी/तुकाराम गणगे

तालुक्यातील प्रशासनासोबत लोकप्रतिनिधी व जनतेने कोरोना या महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लॉकडॉउन मध्ये जबाबदारीने काम केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असून ही परिस्थिती एकट्या कोणामुळे रोखू शकत नव्हती कोणीच या परिस्थितीला पुरणार नव्हते
पण सर्व घटकातील लोकांनी या कोरोनाशी संघर्ष केल्यामुळे मोलाची साथ दिल्यामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत यापुढेही सर्वांनी अशीच साथ द्यावी असे आवाहन आ बाळासाहेब आजबे यांनी आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कोरोना योद्धा पुरस्कार वितरण प्रसंगी केले.तहसील येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमाला माजी आ साहेबराव दरेकर, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ शिवाजी राऊत, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, तहसिलदार वैभव महेंद्रीकर, पोलिस उपअधीक्षक विजय लगारे,किशोर हंबर्डे,सुनिल नाथ, दत्ता काकडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ आजबे म्हणाले कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभाग,पोलिस विभाग,महसूल,पत्रकार, नर्स, विज वितरण विभाग सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र २४ तास कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात कोरोना योद्धे म्हणून काम केलेल्या आष्टी तालुक्यातील २१ जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.तर यापुढच्या काळात हि कोरोना महामारीमध्ये पक्ष निष्ठा सोडून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन आ आजबे यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आ साहेबराव दरेकर, डॉ शिवाजी राऊत, विजय लगारे,शारदा दळवी, संतोष कोठुळे, प्रफुल्ल शहस्त्रबुद्धे, दत्ता काकडे, माढेकर, डॉ नदिम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला डॉ.जालिंदर वांढरे, पं. स सदस्य संदीप अस्वर, नाजिम शेख, जगन्नाथ ढोबळे,सुनिल पारखे, आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णासाहेब चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार काकासाहेब शिंदे यांनी केले.

*आष्टी तालुक्यातील सन्मानित पुरस्कार प्राप्त*

पोलीस मित्र ज्ञानदेव पोकळे, अंनत जोशी, भैरवनाथ भोसले,शाहीन बाग कमीटीचे डॉ नदिम शेख,सिताराम टेकाडे,सुनिल रेडेकर,शिवाजी गोरे,डाॅ गणेश पिसाळ,डाॅ पंडितराव खिलारे,पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक अरूण कांबळे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे,मंडळ अधिकारी पाडूरग माढेकर, पत्रकार उत्तम बोडखे,अविनाश कदम,दत्ता काकडे,प्रफुल्ल शहस्त्रबुद्धे,डाॅ प्रफुल्ल गोसावी,डॉ नितीन मोरे, डॉ संतोष कोठुळे, डॉ राहुल टेकाडे,नायब तहसिलदार शारदा दळवी,निलिमा थेऊरकर,प्रदीप पाडुळे, पोलिस उपअधीक्षक विजय लगारे,तहसिलदार वैभव महिंद्रेकर,आरोग्य सेविका विद्या घुगे,आरोग्य सेविका वंदना भैसाडे यांना सन्मानित करण्यात आले.

Sharing

Visitor Counter