एकल महिला संघटनाच्या धानोरा रोड बीड प्रभाग शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

एकल महिला संघटनाच्या धानोरा रोड बीड प्रभाग शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न
बीड/वार्ताहर
एकल महीला संघटना शाखा धानोरा रोड बीडचे उद्घाटन नगरसेविका सौ. जयश्री विलास विधाते, कार्यरंभ च्या पत्रकार श्वेतांबरी घाडगे, एकल महीला संघटना प्रभाग बीड च्या अध्यक्ष संगिता मेटे यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी एकल महिला संघटना बीड सचिव रुक्मिणी नागापुरे यांनी सूत्रसंचालन केले याप्रसंगी प्रभाग शाखा अध्यक्ष संगिता मेटे , उपाध्यक्ष द्वारका ठोंबरे यांनी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला तर रूक्मिणी नागापुरे यांनी एकल महीला संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकत महीलांना संघटीत होण्याचे आवाहन केले . आपल्या अध्यक्षीय भाषणात नगरसेविका सौ. जयश्री विधाते यांनी एकल महीला भगीनींच्या नगरपरिषदेशी निगडीत समस्या मार्गी लावत शिक्षण-आरोग्य-प्रशिक्षण आणि रोजगाराशी संबंधित वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगीतले , दै. कार्यारंभच्या पत्रकार भगीनी श्वेतांबरी घाडगे यांनी वर्तमान पत्राच्या माध्यमातून एकल महिला संघटना च्या महीलांच्या आवाजाला बळ देऊन शासनदरबारी त्यांच्या न्याय मागण्यासाठी सतत प्रयत्नशील राहु अशी ग्वाही दिली.यावेळी एकल महिला संघटना च्या शिल्पा पंडीत( शिक्षण समिती बीड ता. अध्यक्ष) अश्विनी घोडके, अयोध्या जगताप, राधा वाघमारे, सारिका पवार, ममता झाडीवाले, शारदा ढगे, अश्विनी तिरगुळ यांनी परिश्रम घेतले तसेच यांच्यासह शक्ती महीला मंडळ धानोरा रोड, सावित्री महीला मंडळ अंकुश नगर , प्रतिष्ठा महिला मंडळ तक्षशिला नगर , दृष्टी महीला मंडळ कृषी नगर बीडच्या एकल महिला संघटना च्या महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








