आमदार साहेब गढूळ पाणी फक्त प्रचाराच्या वेळेस दिसतो का?

Beed

आमदार साहेब गढूळ पाणी फक्त प्रचाराच्या वेळेस दिसतो का?

बीड/वार्ताहर 

बीड शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातील मुख्य समस्या म्हणजे शहरातील रस्ते नाल्या आणि पिण्याचे पाणी या आहेत परंतु याकडे सर्वांचेच दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे परवा मोहम्मदीया कॉलनी भागातील नागरिकांना पिण्याचा पाणी जणू गटारीतून पाईपलाईन करून दिल्यासारखं आला नागरिकांना तो पाणी बघून प्रश्न निर्माण झाला की हे पाणी लोकांना पिण्यासाठी आहे की जनावरांना? मात्र याकडे आमदार साहेब असतील किंवा प्रशासन असेल यांचा दुर्लक्ष असल्याचा बोलायला हरकत नाही आमदार साहेबांनी प्रचाराच्या वेळेस बिसलेरीत पाणी भरून प्रचार केला होता त्यावेळेस त्यांना गढूळ पाणी दिसला परंतु आता दिसत नाही का? असं देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोहम्मद कॉलनी भागातील गेल्या दोन दिवसापासून नळाला पिण्याचे पाणी गडूळ आल्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत असून या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकाही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही डेंगू मलेरिया सारख्या मोठ्या आजाराला नागरिकांना सामोर जाण्यास हे पाणी भाग पाडतो गेल्या वर्षभरापासून प्रशासन बसलेला असून देखील शहरात हे चित्र पाहण्यास मिळत आहे हे खूप दुर्दैव म्हणावे लागेल. जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

 

 

 

 

 

Sharing

Visitor Counter