राष्ट्रवादी कॉ महिला अध्यक्षा अंजली पाटील यांनी विविध कार्यक्रम आयोजित

राष्ट्रवादी कॉ महिला अध्यक्षा अंजली पाटील यांनी विविध कार्यक्रम आयोजित
बीड/प्रतिनिधी
आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्य अंबाजोगाई येथें राष्ट्रवादी कॉ महिला अध्यक्षा अंजली पाटील यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले , त्यामध्ये प्रदेश अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार व जिल्हा अध्यक्षा संगीत तुपसगर यांच्या मार्गदर्शनाने "महाराष्ट्रची मर्दानी"हा उपक्रम घेण्यात आला, त्यामध्ये देशावर आलेल्या कोरोनाच्या संकट काळात विविध छेत्रामध्ये काम करत असताना थोड ही न घाबरता आपण समाजच काहीतरी देणं लागत आहोत असे समजून काम करणाऱ्या काही महिला भगिनींचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये महिला डॉ . महिला पत्रकार,महिला पो अधिकारी,महिला साफसफाई कामगार,अंगणवाडी सेविका इ महिलांना पुरसकृत करण्यात आले तसेच काळाची गरज समजता रक्तदान शिबिर घेण्यात आले, यावेळी अंबाजोगाईचे विधान परिषेदेचे आ.संजयभाऊ दौंड, उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे,मा आ साठे साहेब मा दत्ता आबा पाटील ,विलास काका सोनवणे, रंजितचाचा लोमटे पंचायत समिती सभापती जगताप ताई व पक्ष्याचे सर्व कार्यकर्ते उपस्तीत होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजीवनी देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार तालुका अध्यक्षा अंजली पाटील यांनी केले , व सोशल डिस्टन्स पाळून कार्यक्रम पार पाडला.








