बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका काँग्रेस पक्ष ताकतीने लढणार - गणेश बजगुडे पाटील

बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका काँग्रेस पक्ष ताकतीने लढणार - गणेश बजगुडे पाटील
बीड/वार्ताहर
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना गावपातळीपासुन जिल्हाभरातील सर्वच पुढारी तळठोकून असल्यामुळे ऐन कडाक्याच्या थंडीत ग्रामपंचायत वातावरण तापलेले दिसत आहे. बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायत निवडणुकांपैकी सर्वाधिक १३२ ग्रामपंचायत निवडणुका बीड तालुक्यात लागलेल्या असुन काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ताकतीने निवडणुका लढण्याचे आव्हान बीड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे.
लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी गावपातळीवरील निवडणुका लढणे महत्त्वाचे असुन गावोगाव काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. "संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना" यासारख्या गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या असुन, काँग्रेसने नेहमीच विकासाचे व लोकहिताचे राजकारण केलेले आहे. म्हणुन गावाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनता काँग्रेसला निवडून देईल. ग्रामपंचायत निवडणुक जरी पक्षीय चिन्हावर नसली तरी जनतेचा विश्वास आमच्यासोबत आहे. काँग्रेस पक्षाला व खासदार रजनीताई पाटील परिवाराला मानणारा मोठा वर्ग बीड मतदार संघात असुन काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यानी मोठ्या ताकतीने निवडणुक लढवून जास्तीत जास्त सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य निवडूण देण्याचे आवाहन काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे.








