बीड शहरातील माळी गल्ली,अडत मार्केटच्या डी.पी पासून दोन नवीन पोल व केबल तात्काळ बसुन द्यावे - राजा इनामदार
Beed

बीड शहरातील माळी गल्ली,अडत मार्केटच्या डी.पी पासून दोन नवीन पोल व केबल तात्काळ बसुन द्यावे - राजा इनामदार
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील माळी गल्ली अडत मार्केट ची डी.पी पासुन अडत मार्केट समोर नवीन दोन पोल व त्याच्यावर नवीन केबल टाकून तात्काळ देण्यात यावे.
कारण गल्ली मध्ये चार नंबर पोलवरून सर्वात जास्त कनेक्शन आहेत व सर्व आजूबाजूचे लोक व महावितरणाचे ग्राहक आहेत त्यांना त्या पोलवरून कनेक्शन घेण्यासाठी दोनशे फूट लांबीवरून
कनेक्शन असल्यामुळे शेजारी लोकांना त्रास होत आहे
लोकांच्या घरावरून कनेक्शन त्यांचे आपसात देखील भांडण होत आहे.
दोन पोल नवीन टाकल्यानंतर बरेच कनेक्शन त्या नवीन
पोलवरून घेता येईल व हे पोल नाही टाकल्यास लोकंना याचा धोका होण्याची शक्यता आहे याची दखल घेत अधिक्षक अभियांता साहेबांनी तात्काळ दोन नवीन पोल बसुन द्यावे हि विनंती








