माळी गल्ली,कारंजा टॉवर,रोड व नालीचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा तिव्र आंदोलन - शाहरुख खान 

Beed

माळी गल्ली,कारंजा टॉवर,रोड व नालीचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा तिव्र आंदोलन - शाहरुख खान 

बीड/प्रतिनिधी

बीड येथील माळी गल्ली वार्ड क्र. 17 येथील व्यंकटेश हॉस्पीटल ते उमर मस्जीद या भागातील रस्ता खराब झाला आहे. या रस्त्याचे काम करावे यासाठी नगर परिषद प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी अर्ज दिले आहेत. या रस्त्याचे काम आज पर्यंत झाले नाही. सदर रस्त्याचे काम त्वरीत सुरु करावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक शाहरुख खान यांनी दिला आहे. नगर परिषद प्रशासनानी व्यंकटेशन हॉस्पीटल ते उमर मस्जिद, माळी गल्ली येथील सिमेंट रस्ता आठ दिवसात सुरु करावे व कारंजा टॉवर ते माळी गल्ली चौक येथील सिमेंट रस्त्याचे काम पुर्ण होऊ अनेक महिने उलटले आहेत. तरी पण या रस्त्याचे व नालीचे काम आजपर्यंत झालेले नाही. नाल्या तुंबल्या असुन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तरी नगर परिषद प्रशासनानी कारंजा टॉवर ते माळी गल्ली चौक येथील सिमेंट नालीचे काम त्वरीत सुरु करावे. या वार्ड क्र. 17 व 18 कडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या अजिजपुरा, खंदक, माळी गल्ली भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या भागात सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. यामुळे परिसरातील नागरीकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून नागरीकांचे व लहाण मुलांचे आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. या भागात नालीचे पाणी, साचलेल्या या कचऱ्यामुळे डेंगू, हिवताप, मलेरीया यांसारख्या साथीचे आजार पसरण्याची भिती निर्माण झाली आहे.

तरी या समस्या कडे नगर परिषद प्रशासनानी लक्ष देऊन त्वरीत व्यंकटेश हॉस्पीटल ते उमर मस्जीद, माळी गल्ली येथील सिमेंट रोड चे काम त्वरीत आठ दिवसात सुरु करावे व कारंजा टॉवर माळी गल्ली चौक येथील सिमेंट नाली चे काम त्वरीत सुरु करावे. तसेच या भागात साफसफाईची कामे करुन घ्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा मा. मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे समाजसेवक शाहरुख खान यांनी दिला आहे.

Sharing

Visitor Counter