भारतीय स्वतंत्रता पूर्व इतिहास हा गंगा जमुनी संस्कृति सारखा लोकांमध्ये एकता निर्माण करतो प्रसिद्ध इतिहासकार सरफ़राज़ अहमद

Beed

भारतीय स्वतंत्रता पूर्व इतिहास हा गंगा जमुनी संस्कृति सारखा लोकांमध्ये एकता निर्माण करतो प्रसिद्ध इतिहासकार सरफ़राज़ अहमद

बीड/प्रतिनिधी 

देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद पाच दिवसीय महोत्सव लोकसेना संघटनेच्या वतीने बीडला साजरा होत आहे यातील पाचवा दिवस इक़बाल टिपू आज़ाद कॉन्फ्रेंसचा म्हणजेच व्याख्यानाचा होता पाच दिवसीय कार्यक्रमाची माहिती प्रस्तावनेद्वारे प्रा. इलियास इनामदार यांनी सांगितली राष्ट्रीय कवी डॉ. अल्लामा इक़बाल यांच्यावर व्याख्यान औरंगाबादचे प्रसिद्ध व्याख्याते डॉ. इरतेकाज़ अफ़ज़ल सर करणार होते परंतु त्यांना किडनीचा त्रास होत असल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या जागी अब्दुल रहीम साकिब सर यांनी इक़बाल यांच्यावर सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर शहीद टिपू सुलतान यांच्यावर व्याख्यान करण्यासाठी सोलापुरहुन प्रसिद्ध इतिहासकार व्याख्याते सरफ़राज़ अहमद साहेब आले होते त्यांनी शहीद टिपू सुलतान व हैदर अली यांच्यावर बीड वासियांना सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की टिपू सुलतान जीवंत असे पर्यंत इंग्रजांना भारतावर कब्ज़ा करणे अशक्य होते पण ज्यादिवशी टिपू सुलतान देशासाठी इंग्रजांच्या विरोधात युद्धामध्ये शहीद झाले त्यादिवशी खऱ्या अर्थाने पूर्ण भारत देश इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला थोर स्वंत्रतासेनानी यांचा भारतीय स्वतंत्रता पूर्व इतिहास हा देशातील दोन्ही समाजाला गंगा जमुना तहेज़ीबी सारखा जोड़णारा आहे प्रत्येक नागरिकाने यांच्या विषयी माहिती स्वत घेणे इतरांना सांगावे असे आव्हान केले त्यानंतर भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांच्यावर व्याख्यान करण्यासाठी सोलापुरहुन जमियत उलेमा ए हिंदचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रसिद्ध व्याख्याते मौलाना इब्राहिम कासमी साहेब आले होते त्यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये मौलाना आज़ाद यांच्या जीवनावर, त्यांच्या शैक्षणिक कामकाजावर, त्यांनी भारतीय समाजाला दिलेला एकता एकात्मतेचा संदेश या विषयी सविस्तर माहिती दिली मिर्ज़ा नदीम बेग व लोकसेना संघटना जिल्हाप्रमुख सुफियान मणियार यांनी कार्यक्रमाला अालेल्यांचे आभार व्यक़्त केले या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते जमियत उलेमा ए हिंदचे बीड जिल्हाध्यक्ष मुफ़्ती अब्दुल्लाह कासमी, हाजी अब्दुल खालेक पेंटर, शेरजमा खान, मौलाना ज़फर काज़ी, अरशद सिद्दीकी, हसीन अखतर, काज़ी मुजीबूर रहेमान, दिव्यवार्ताचे संपादक अबूबकर चाऊस, उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजतबा अहमद खान, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधि सय्यद एजाज़, जमाते इस्लामीचे एसआईओचे सदर हमीद सर व त्यांची संपूर्ण टीम, मुफ्ठा उर्दू संघटनेचे राज्य सचिव शाहेद कादरी, टिपू सुलतान ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. नदीम खान, समाजसेवक जुनेद अतार, उदगीरचे नगरसेवक अहमद सरवर आमेर मदनी शाहनवाज़ खान समीर सरकार व बहुसंख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मिर्ज़ा खैसर बेग, सुफियान मणियार, अयाज़अखतर, शेख समीर, मिर्ज़ा नदीम बेग, गुलाम साकिब सर, शेख रज़ी, अफ्फान भाई, नदीम मेंबर, कलीम काज़ी व मित्रमंडळ यांनी प्रयत्न केले.

                               

Sharing

Visitor Counter