शहीद टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी

Beed

शहीद टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी

चौसाळा/वार्ताहर 

येथे ढोलताशांच्या गजरात, मिरवणूक काढून, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात भारताचे प्रथम स्वातंत्र्य सेनानी तसेच शेर ए हिंद ,भारतात पहिले रॉकेट बनविणारे थोर योद्धे शहिद हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली.

20 नोव्हेंबर 1750 रोजी कर्नाटकातील देवनहल्ली येथे जन्मलेल्या टिपूचे पूर्ण नाव सुलतान फतेह अली खान शाहाब होते.चौसाळा गावात हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली यावेळी शारुक कुरेशी, असलंम शेख, फहीम इनामदार, शोएब मुजावर, सोहेल सय्यद व तेथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. न्यू चंदन ग्रुप च्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Sharing

Visitor Counter