ट्रॅक्टर मालकाकडून मध्यस्थिच्या घरात घुसून मारहाण करत केले अपहरण

Beed

ट्रॅक्टर मालकाकडून मध्यस्थिच्या घरात घुसून मारहाण करत केले अपहरण

मारहाणीत कोयता-कुर्‍हाडींचा वापर; तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड/प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील ट्रक्टर मालक असलेल्या सतिश गोविंद जायपत्रे, निलेश सतिश जायपत्रे, भैय्या सतिश जायपत्रे पिता पुत्रांनी आपल्या सोबत तीन गाड्या भरून वीस ते पंचविस माणस घेवून येत गेवराई तालुक्यातील बेलगुडवाडी येथील मध्यस्थी असलेल्या एकनाथ राठोड यांच्या घरावर मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास हल्ला करत घरातील व्यक्तींना कोयता कुन्हाडीने मारहाण करून अपहरण केल्याची घटना तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

गेवराई तालुक्यातील बेलगुडवाडी येथील एकनाथ देवू राठोड (वय 58 वर्षे) मोलमजूरी व ऊसतोडणी करून आपली उदनिर्वाह भागवितात. जेष्ठ नागरिक असल्याने अनेक जण त्याच्यावर भरवसा ठेवत पैशाचे व्यवहार करत असतात. त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील जायपत्रेवाडी येथील ट्रक्टर मालक असलेल्या सतिश जायपत्रेंनी राठोड यांना मध्यस्थी ठेवत एका मुकादमाला पैसे दिले. मात्र त्या मुकादमाला मजूरांनी फसविल्याने मुकादमांनी ट्रक्टर मालकाला पैसे परत केले मात्र त्यातील काही पैसे मुकादमाकडे शिल्लक राहिले. ते पैसे काही दिवसांनी देतो म्हणून तो फरार झाला. मात्र त्यानंतर त्याचा सांगसुगावा लागत नसल्याने ट्रक्टर मालक असलेल्या सतिश गोविंद जायपत्रे यांनी आपल्या दोन मुलासह वीस ते पंचवीस जणांना घेवून येत कुठल्याही प्रकारची विचारपुस न करत डायरेक्ट शनिवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास येवून गाढ झोपेत असतांना मारहाण करत मध्यस्थील असलेल्या एकनाथ देवू राठोड यांचे अपहरण केले आहे. यावेळी वडीलांचे अपहरण करत असल्याने अडवणुक करणार्‍या बाळासाहेब एकनाथ राठोड (वय 34 वर्षे), संजय एकनाथ राठोड (वय 32 वर्षे), सुन ललिता संजय राठोड, नातू यश संजय राठोड यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पत्नी राधाबाई एकनाथ राठोड यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात आरोपी सतिश गोविंद जायपत्रे, निलेश सतिश जायपत्रे, भैय्या सतिश जायपत्रे यांच्यासह अज्ञातांवर भादवी कलम 34 नुसार 363, 365, 324 व 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून करण्यात येत आहेत.

 

महिलांसह लहान मुलांनाही केली मारहणा

शनिवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास झोपेत धोंडा घातल्या साखरे वीस ते पंचविस जणांना सोबत घेवून येत एकनाथ राठोड यांच्यावर ट्रक्टर मालकांकडून मारहाण करण्यात आले. मारहणा करू नका म्हणणार्‍या सुना व लहान नातवंड यांनाही मारहाण केली आहे. यात बालक असलेल्या यश राठोच्या डोक्यात मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter