प्रतिक कांबळे यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

प्रतिक कांबळे यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्रात सर्वप्रथम बीड येथे डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना करण्यात आली. दरम्यान दिनांक 4 नोव्हेंबर रोजी वडवणी येथे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिरसाट उपस्थित होते. या बैठकीदरम्यान
महाराष्ट्रा राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या उप जिल्हाध्यक्ष पदी दै झुंजार नेताचे उप संपादक प्रतिक कांबळे यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीतील सदस्यांना एस. एम. देशमुख सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हा कार्याध्यक्ष - मोरे, जिल्हा उपाध्यक्ष - विश्वंभर मुळे, जिल्हा उपाध्यक्ष - प्रतीक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष - संग्राम धनवे, बीड तालुका अध्यक्ष - अभिजीत पवार, वडवणी तालुका अध्यक्ष - ओमप्रकाश साबळे, आष्टी तालुका अध्यक्ष - संदीप जाधव, गेवराई तालुका अध्यक्ष - अविनाश इंगावले, केज तालुका अध्यक्ष - रामदास तपसे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष - नागेश अवताडे, धारूर तालुका अध्यक्ष - गोवर्धन बडे यांना देखील नियुक्तिपत्रक देण्यात आले.
डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्यांनी आपली प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय डिजिटल मीडियाकडे विश्वासार्हतेने पाहिले जाणार नाही. येणारा काळ हा डिजिटल मीडियाचा अर्थात सोशल मीडियाचा आहे, असे स्पष्ट मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस. एम. देशमुख सर यांनी यावेळी व्यक्त केले. भविष्यकाळात डिजिटल मीडियाचे महत्त्व किती असेल यावर देखील चर्चा सत्र संपन्न झाले. त्यानुसार आपल्याला काम करावे लागेल अशा पद्धतीने सुद्धा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना एस. एम. देशमुख सरांनी केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषदेचे वडवणी तालुका अध्यक्ष अँड. विनायक जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डिजिटल मीडिया परिषदेचे वडवणी तालुका अध्यक्ष ओमप्रकाश साबळे यांनी व्यक्त केले.








