संभाजी भिडेला अटक करा. रुक्मिणी नागापुरे

संभाजी भिडेला अटक करा-रुक्मिणी नागापुरे
बीड/वार्ताहर
साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारांच्या खाजगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होईल असे वर्तन करीत विनयभंग केला आहे तरी या घटनेमुळे समस्त विधवा महिलांचा अपमान झाला आहे असे आम्ही मानतो. सबब असंवैधानिक वर्तन केल्यामुळे संभाजी भिडे विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांनी केली आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेल्या भिडे यांनी आपल्या मनुवादी प्रवृत्तीच्या विधानाने साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे ह्यांच्या वयक्तिक रहाणीमानाबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलले आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार " कपाळावर टिकली लाव " असा उर्मटपणा करीत, भारतमाता विधवा नाही असे काल मंत्रालयाच्या सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे विनयभंग केला आहे. एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा कृती करणे, एखादी वस्तू, गोष्ट दाखवणे, ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खाजगीपणाचे उल्लंघन होईल असे वर्तन करणे या अपराधासाठी १ वर्ष सजा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा तरतूद आहे.
आपल्या समाजात वावरताना महिला पुरुष समान आहेत, समानतेची वागणूक सर्वाना समान न्याय, हक्क, व अधिकार आहे
लोकशाहीत प्रत्येकाला स्वेच्छेने राहण्याचा आणि जगण्याचा हक्क आहे. राज्यघटना च्या आधारित इथे सर्व समान आहेत,पण संभाजी भिडे मात्र महिलांच्या ह्या अधिकाराला मान्य करीत नाहीत. आणि महिलांच्या दुखण्यावर मीठ चोळल्यासारखे वर्तन केले असून महिलांचा विनयभंग केला आहे त्याच्या या वर्तनावर त्याला सजा मिळाली पाहिजे, क्रांतीज्योती महात्मा फुले, यांनी महिलांसाठी शिक्षण ची दारे उघडली,विधवांचे केशनवपन, प्रथा बंद केली, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समान संधी, समान अधिकार दिला न्याय, हक्क दिले, संपत्तीत अधिकार दिले, तर राजा राममोहन राय यांनी सतीची चाल बंद केली तरी 21 व्या शतकात आपण विज्ञानवादी युगात असताना सुशीक्षित असून उघड्या डोळ्यांनी हे सर्व समोर बोलतांना चुकीने कृती करताना पाहतो आणि शांत बसतो? ज्या महिलेच्या योनीतुन जन्म घेतला तिला आपण नाकारत आहोत तीच नात समाजात पुरुष जन्म होईल का? डोकं या पुरुषी अहंकार चे डोके जाग्यावर आहे का? आपल्याला आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी यांचा अपमान होताना जराही वाईट वाटत नाही का? धिक्कार आहे अशा समाज व्यवस्थेचा !!
भिडे ह्यांनी केवळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला नाही तर नकार देताना उद्धट व अरेरावीपणे टिप्पणी केली व एका पत्रकार महिलेचा विनयभंग केला आहे. तरी संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये व महिलांवर उठसुठ बोलणार्यावर निर्बध घालावे
एकल महिला संघटना भिडेच्या ह्या वक्तव्याचा निषेध करीत असून पोलिसांनी स्वतः गुन्हे दाखल करून भिडेला अटक करावी अशी अपेक्षा एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे ह्यांनी व्यक्त केली आहे.








