शिवसंग्रामचे युवा नेते इम्रान जागीरदारच्या दणक्याने प्रशासन आले वटणीवर

Beed

शिवसंग्रामचे युवा नेते इम्रान जागीरदारच्या दणक्याने प्रशासन आले वटणीवर

बार्शीनाका पुल ते राष्ट्रवादी भवन पर्यंत केले डांबरीकरण

बीड/वार्ताहर

     शिवसंग्रामचे युवा नेते इम्रान जागीरदार यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली होती की, बार्शी नाका पुल ते राष्ट्रवादी भवन शिवाजी महराज यांच्या पुतळयापासून ते नगर रोडच्या बंगल्या पर्यंत खड्डे भरण्याच्या कामाला सुरूवात केली होती. पण खड्डे काय भरता डांबरीकरणचा रस्ताच करा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीचा दखल घेत प्रशासनानी तात्काळ या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली इम्रान जागीरदार यांच्या एकच दणक्याने प्रशासन वटणीवर आले आणि खड्डे ना भरता डांबरीकरणाचा रस्ताच करू लागले या मुळे बीड शहरातील अनेक नागरीकांनी युवा नेते इम्रान जागीदार यांचे अभिनंदन केले आहे. स्व.आ.विनायकराव मेटे यांनी राज्य शासनाकडे वारंवार मागणी केली की बीड शहरातील बायपास टू बायपास या रस्त्याच्या कामाला तात्काळ निधी देऊन काम सुरू करावे याकरीता त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांची ही भेट घेतली होती. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज चौक ते नवगण राजूरी पर्यंतच्या रस्तेच्या कामाला ही स्व.मेटे यांनी मंजूरी मिळून घेतली होती पण कांही संधी साधू फोटो बहादूर पुढार्‍यांनी या रस्त्याच्या कामला सुरूवात होताच स्वतःच्याच हस्ते नारळ फोळून या रस्तेच्या कामाला आम्हीच मंजूरी आणल्याचे दाखवत फोटोसेशन केले होते पण ठेकेदारांनी अर्धावट काम करून पळ काढली होती. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे झाले होते नागरीकात प्रचंड चिढ निर्माण होत होती रस्त्याच्या कामाचा श्रेय घेताच झालेल्या खड्डयाचा श्रेय कोण घेणार म्हणून इम्रान जागीदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली की खड्डे ना भरता तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरूवात करा याच मागणीमुळे आज रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे त्यामुळे नागरीकात समाधान असून अनेकांनी इम्रान जागीदार यांचे आभार मानले आहे.

Sharing

Visitor Counter