जुने महसूली कागदपत्र मिळण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये उर्दू जानकार नेमावे लोकसेना

जुने महसूली कागदपत्र मिळण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये उर्दू जानकार नेमावे लोकसेना
बीड/प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निज़ामकालीन, मुग़लकालीन, आदिलशाह कालीन, शिवशाहीकालीन पेशवेकालीन व इंग्रज़कालीन अनेक वर्षापूर्वीचे जुने उर्दू/फ़ारसी महसूली कागदपत्रे आहे या कागदपत्राची लोकांना शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक व न्यायलयाच्या कामकाजासाठी गरज भासते लोकांनी उर्दू/फ़ारसी कागदपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, तहसीलमध्ये अर्ज केल्यास उत्तर मिळते की आमच्याकड़े उर्दू फ़ारसी भाषिक जानकार उपलब्ध नाही म्हणून आम्ही आपणास कागदपत्र देवू शकत नाही. लोकसेना संघटनेची राज्य सरकारला मागणी आहे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उर्दू जानकार कर्मचारी उपलब्ध करावा. जेणे करुन राज्यातील जनतेला त्रास होणार नाही अशी मागणी महाराष्ट्र शासनाला जिल्हाधिकारी मार्फ़त लोकसेना संघटना प्रमुख
ॲड. प्रा. इलियास इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार यांनी केली आहे सोबत मिर्ज़ा खैसर बेग, ॲड. कलीम काज़ी, अब्दुल रहीम साकिब सर, अयाज़ अखतर, मिर्ज़ा नदीम बेग सहाब, समीर शेख, प्रा. संजय खांडेकर, अतीख अहमद खान होते.








