मूळव्याध, भगंदर,नासूर उपचार शिबीरचे आयोजन

Beed

मूळव्याध, भगंदर,नासूर उपचार शिबीरचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ बीड व श्री माहेश्वरी प्रगती मंडळा पुढाकार

बीड/वार्ताहर 

 रोटरी क्‍लब ऑफ बीउ व माहेश्‍वरी प्रगती मंडळाच्या पुढाकारातून मूळव्याध, भगंदर, नासूरवर उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान हे शिबीर आदित्य हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे होणार असल्याची माहिती रोटरी क्‍लब ऑफ बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव सुनिल जोशी, नंदकुमार जेथलिया यांनी दिली.

रोटरी क्‍लब ऑफ बीड व माहेश्‍वरी प्रगती मंडळाच्या वतीने आयोजीत या शिबीरात तज्ञ डॉक्टर देवेंद्र शहा यांच्यासह दिल्ली , मुंबई, जयपूर व बुलंदशहर येथून सर्व तज्ञ डॉक्टर्स तपासणीसाठी येणार आहेत. डॉक्टर पारुल बेन, डॉक्टर सुजाता बेन या महिला रुग्णांची तपासणी करून औषध उपचार व क्षारसुत्र पद्धतीने मुळव्याध सारख्या असहाय्य रोगावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.  

रुग्णांनी विजय एजन्सीज, संत सावता माळी चौक, बीड मो 98223 90024, बीड शेती सुधार केंद्र, जुना मोंढा बीड, मो.94222 40058, गणेश उडपी हॉटेल, बस स्टँड समोर बीड , मो 93704 41414, पायल साडी, सुभाष रोड बीड मो 94222 41285, डॉक्टर विवेक कुलकर्णी, आदित्य हॉस्पिटल नाळवंडी चौक बीड मो 83294 88569 येेथे नाव नोंदणी करावी असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव सुनील जोशी, शिबिर प्रमुख सुरज लाहोटी, प्रोजेक्ट चेअरमन प्रमोद निनाळ, को-चेअरमन आर.बी.घोडके, माहेश्वरी प्रगती मंडळ अध्यक्ष श्री नंदकुमार जेथलिया , सचिव बद्रीनारायण मानधने, प्रोजेक्ट चेअरमन सीए गोपाल कासट, माहेश्वरी सभा जिल्हा अध्यक्ष प्रदीप चितलांगे, सचिव संतोष सोहनीजी, वाय.जनार्दन राव, राजेंद्र मुनोत, अभय कोटेचा, सीए सुरेश लड्डा, मुकुंद कदम, संतोष पवार, सीए बी.बी.जाधव, खंडागळे, विकास अमरापुरकर, अभय पटवारी, शरद लोढा, सुमित जैसवाल, उदय नागरगोजे यांच्यासह रोटरी क्लब बीड व माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter