सरकारने अनखी किती तरण्या बांड पोरांचा जिव घ्यायचं ठरवलं आहे - बाजीराव ढाकणे

सरकारने अनखी किती तरण्या बांड पोरांचा जिव घ्यायचं ठरवलं आहे - बाजीराव ढाकणे
बीड/वार्ताहर
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी यंत्रणा मात्र निवांत गाढ झोपेत आहे. पिकविमा कंपनी म्हणते शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे फोटो काढून ऑनलाईन तक्रार दाखल करा. पण माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कोठे माहीत आहे. कशी करायची ऑनलाईन तक्रार त्यामुळे शेतकरी पिकविमा मिळण्यापासून कोसो दूर आहे.सरकारी पंचनामे तर झालेच नाहीत.बीड जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांला सरकारी अनुदान मिळाले नाही तसेच मिळेल की नाही हे पण सांगता येत नाही.कारण महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री म्हणतोय ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही.दिवाळी जशी जशी जवळ येत होती तशे तशे शेतकरी चिंताग्रस्त झाले दिवाळी सणासाठी बाजारातून दिवाळीचा फराळ बनवायला सामान कसं खरेदी करावं कारण खिशात पैसा नाही आणि पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यात जमा आहेत. शेतात काढणीस आलेलं पिकं अतिवृष्टीमुळे वाया गेलं आहे आणि पिकविमा व सरकारी अनुदान हि मिळण्याची शक्यता नाही.मग लेकरांना नवीन कपडे खरेदी कसे करावे हे सुचत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तरीही सरकारी यंत्रणा मात्र निवांतच आहे.
ऑक्टोबर महिन्यात बीड जिल्ह्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तरीही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळ मुंबईत गुप्त बैठकांमध्ये व्यस्त आहेत. पण एकानेही माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या बांधावर येण्याचे कष्ट घेतले नाही. काय हे सरकार अन् काय ही सगळी सरकारी यंत्रणा बीड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत विजा पडल्यामुळे जिवितहानी आणि प्राणीही प्रचंड झाली आहे.
काल मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी केज तालुक्यातील मौजे जोला येथील 31 वर्षे वयाच्या तरण्या बांड पोरांने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन जिवन यात्रा संपवली कारण काय तर डोक्यावर झालेलं प्रचंड कर्ज अन् अतिवृष्टीमुळे शेतातील काढणीस आलेलं सोयाबीनचे पीक वाया गेलं आहे. दिवाळी सणासाठी आपल्या घरात लहान लेकरांना ना कपडे घेता आले आहेत. ना घरात दिवाळी सणासाठी बाजारातून दिवाळीचा फराळ बनवायला सामान घेता आले आहे.
मौजे जोला ता केज येथिल गणेश मारोती सारुक या 31 वर्षाच्या तरुण्याच्या नावावर फक्त 59 गुंठे जमीन आहे. कुटुंबात पत्नी वैशाली गणेश सारुक 30 वर्षे दोन मुली स्वाती व ज्योती अन् मुलगा माऊली 4 वर्षे तसेच वयोवृद्ध आजी भागाबाई या सर्व सदस्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी गणेश मेटाकुटीला आला होता. याचं विचारचक्रातुन गणेश या तरण्या बांड पोरांने ऐन दिवाळीत स्वतःची जिवन यात्रा संपवली अन् कुटुंब उघड्यावर पडले आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वेदनादायक झाली आहे. हातातोंडाशी आलेली पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. हीच स्थिती सध्या संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झाली आहे, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास मातीत मिसळला आहे, अवघ्या 25 दिवसात बीड जिल्ह्यत 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि आपला निगरगट्ट कृषी मंत्री म्हणतोय जास्त नुकसान नाही झालं. आरे तुम्ही रोज रोज मुख्यमंत्री शिंदे च्या बंगल्यावरच जाऊन बसाल तर तुम्हाला कसं कळणार शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आहे. दिसत नसेल तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला हाताला धरून चिखलातून फिरून दाखवतो कशा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा चिखल झाला आहे.असो या मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळाला काही शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही.
पण माझी शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही स्वतःची जिवन यात्रा संपवली म्हणजे तुम्ही जिंकलात असे नाही रे बाबा हो लेकरं बाळं उघडी पडतात रे बाबांनो तुम्हाला जर रागच आला तर एखाद्या लोकप्रतिनिधीला झोडपा रुमन्याने काय होयचं ते होऊ द्या बघु नंतर पण एकदा तरी झोडपल्याशिवाय जमणार नाही खासदार अन् आमदार यांना शेतकरीपुत्र








