दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मांजरा-साळ नदीवरील पुल वाहुन गेला; ठेकेदार-आधिका-यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण-डाॅ.गणेश ढवळे 

Beed

दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मांजरा-साळ नदीवरील पुल वाहुन गेला; ठेकेदार-आधिका-यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण-डाॅ.गणेश ढवळे 

बीड/वार्ताहर

पाटोदा शहरातील मांजरा-साळ नदीच्या संगमावरील पुल ठेकेदार-कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत असून थातूरमातूर निकृष्ट काम करून निधी उचलण्याची पाटोदा नगरपंचायत साठी नित्याचेच काम असून संबधित प्रकरणात जबाबदार कंत्राटदार-आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी तसेच नवीन सिमेंट क्राॅक्रीट पुल बांधण्यात यावा यामागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२७ ऑक्टोबर गुरूवार रोजी पुलावर ठीय्या आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी बीड,उपविभागीय आधिकारी, तहसिलदार पाटोदा,मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिला आहे. 

 

स्मशानभुमी, ग्रामिण रूग्णालय,विठ्ठल संस्थान,उप भुमिअभिलेख कार्यालय याच मार्गावर 

जुन्या पाटोदा शहरातुन या पुलाच्या मार्गावर सार्वजनिक स्मशानभुमी,ग्रामिण रूग्णालय,विठ्ठल संस्थान,उप भुमिअभिलेख कार्यालय तसेच भाकरे वस्ती,लऊळ वस्ती,बामदळे वस्ती,असुन या भागातील रहिवाशांना दरवर्षीच पावसाळ्यात पुल वाहुन गेल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

 

विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली,गुरुवारी पुलावर ठीय्या आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे 

विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी दि.३ नोव्हेंबर २०२० रोजी डाॅ.गणेश ढवळे यांच्या ३१ ऑक्टोबर २०२० रोजीच्या तक्रारीवरून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश काढून सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळेच दि.२७ ऑक्टोबर गुरूवार रोजी याच पुलावर ठीय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे. 

Sharing

Visitor Counter