आम्ही चांगल्या कामासाठी सदैव पाठीशी

Beed

आम्ही चांगल्या कामासाठी सदैव पाठीशी

सदिच्छा भेट : बार्टी केंद्राला सदिच्छा भेट देवून केले कौतुक : पप्पू कागदे  

बीड/प्रतिनिधी

समाजाच्या बदलासाठी कोणी धोरणात्मक काम करत असेल तर, त्या व्यक्तीला सपोर्ट केला पाहिजे. आम्ही सुरुवातीपासूनच समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या सदैव पाठीशी उभा राहत आलेलो आहोत,असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्य्क्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले.  

            बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे शनिवार (ता.२२) रोजी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा पप्पू कागदे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पप्पू कागदे बोलत होते. यावेळी सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे, प्रा.बाळासाहेब गव्हाणे,रतन वाघमारे,केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे, सुनिल डोंगरे, लेखापाल अंबिका शिंदे, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा.डॉ.श्रीधर आघाव प्रा.दीपक सोनवणे, सहाय्यक प्रा. दिवाकर तुपारे, सहाय्यक प्रा.अर्चना आठवले, सहाय्यक प्रा.कोमल जगताप, वरिष्ठ लिपिक विनोद जोगदंड, कनिष्ठ लिपिक दिलीप गायकवाड, व्हिडीओ ग्राफर राहुल शिंदे, सहाय्यक दीपक वाघमारे,सहाय्यक गजानन खेत्रे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

      पुढे बोलतांना पप्पू कागदे म्हणाले की, बीड सारख्या ठिकाणी राहुल वाघमारे यांनी एक अतिशय दर्जेदार केंद्र उभारुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बार्टीच्या माध्यमातून एक नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रातून आगामी काळात अनेक विद्याथी घडतील. बीड जिल्ह्यात राहुल वाघमारे यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आणि वाचन चळवळीत मोठे काम उभा राहत आहे, त्यांच्या या कामाचे कौतुक आहे. असे मत युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले.यावेळी संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 

सामाजिक बांधिलकीतून

राहुल वाघमारे यांना सामाजिक चळवळीचे अंग असून संघर्षातून निर्माण होत असलेलं व्यक्तिमत्व आहे. आजघडीला बार्टीच्या माध्यमातून त्यांनी एक व्यापक काम उभा केले आहे. त्याचा अभिमान वाटतो आहे. कारण समाजात एक सुशिक्षित आणि सुसंकृत पिढी त्यांच्या केंद्रातच्या माध्यमातून उदयास येत आहे. समाजात असे काम उभा राहत असेल तर त्याला सपोर्ट असणे गरजेचे आहे. अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.  

Sharing

Visitor Counter