शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा नसता राज्यात आंदोलन करू - अरफात इनामदार ( जिल्हा कार्याध्यक्ष मुप्टा उर्दू, बीड )

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा नसता राज्यात आंदोलन करू - अरफात इनामदार ( जिल्हा कार्याध्यक्ष मुप्टा उर्दू, बीड )
बीड/वार्ताहर
आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी गेल्या बरेच दिवसापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये, त्रुटी मध्ये आलेल्या शाळांची त्रुटी पूर्तता करून घेणे, अघोषित शाळांना घोषित करणे, 20% अनुदान दिलेल्या शाळांना 40 टक्के अनुदान देणे व प्रचलित नियमानुसार अनुदानाचा वाढीव टप्पा देणे, 2005 नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे हे मागण्या सामील आहेत. परंतु या आंदोलनाचे सरकार दखल घेत नसल्यामुळे मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव सुनील मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना पूर्ण राज्यात आंदोलन करणार आहे, असा इशारा मुप्टा उर्दू संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष अरफात इनामदार यांनी दिलेला आहे.








