संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा
बीड/वार्ताहर
बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजनेच्या लाभार्थींना माहे सप्टेंबर 2022 अखेरचे अनुदान बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती बीड तहसिलदार सुहास हजारे यांनी दिली आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनचे एकुण 7 हजार 939 लाभार्थी असून त्यांना 2 कोटी 39 लाख 30 हजार रुपये व इंदिरा गांधी योजनेचे एकुण लाभार्थी 5 हजार 226 व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकुण 9 हजार 156 लाभार्थ्यांना 4 कोटी 87 लाख 5 हजार 600 असे एकुण 7 कोटी 26 लाख 9 हजार 500 असे सर्व लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2022 अखेरचे व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेच्या 88 लाभार्थ्यांना माहे जानेवारी ते मार्च 2022 चे एकुण 52 हजार 800 रुपये अनुदान बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे.








