नांदूर ग्रा.प कडून अपंग व्यक्ती ची दिवाळी गोड

Beed

नांदूर ग्रा.प कडून अपंग व्यक्ती ची दिवाळी गोड

बीड/ शेख अख्तर

आज नांदुर घाट ग्रामपंचायत मध्ये अपंग व्यक्तीची दिवाळी ही गोड व्हावी या उद्देशाने आज नांदूर येथे 5 टक्के अपंग बांधवांना निधी चे वाटप करण्यात आले असून एकूण जवळपास 50 बांधवांना प्रत्येकी 2100 रुपये चेक स्वरूपात वाटप करण्यात आले आहे.

 यावेळी ग्रामसेवक खामकर साहेब, ग्रामपंचायतचे सरपंच पांडुरंग तात्या चांगन, ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल जाधव, व ग्रामपंचायतचे सदस्य तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक बाप्पा मोराळे, पत्रकार अमोल भैया जाधव, पत्रकार श्रीकांत राजे जाधव, पत्रकार जावेद भैया शेख व सादिक शेख यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष विशाल नाळपे व पूर्ण लाभार्थी यांच्या वतीने ग्रामपंचायतचे खूप खूप आभार मानण्यात आले.

Sharing

Visitor Counter