आगामी निवडणुकांसाठी एआयएमआयएम पक्षाची मोर्चे बांधणी जोरात

Beed

आगामी निवडणुकांसाठी एआयएमआयएम पक्षाची मोर्चे बांधणी जोरात

जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊंनी घेतल्या प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, विभागाध्यक्षांच्या भेटी 

बीड/प्रतिनिधी

एआयएमआयएम चे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी बीड नगर परिषद, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद साठी येऊ घातलेल्या आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली असून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील, राज्यकार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, मराठवाडा विभागाध्यक्ष फिरोज लाला,        

महाराष्ट्र प्रदेश सचिव मौलाना महेफुजुर्रहेमान

यांच्या मार्गदर्शनाखाली जोरात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी औरंगाबाद येथे या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे.

      याविषयी सविस्तर वृत्त असे की, बीड नगर परिषदेत गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत पहिल्याच प्रयत्नात एआयएमआयएम चे नऊ नगरसेवक जनतेतून निवडून आले होते. तर एकाला स्वीकृत सदस्य पद मिळाले होते. तेव्हा शहरवासीयांसाठी पक्ष नवा होता. जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. राजकारणातील अनुभवाविना असलेल्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वावर बीड नगरपरिषद ची निवडणूक लढविली गेली होती. तरीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात ५५ नगरसेवकांच्या दालनात पक्षाचे दहा नगरसेवक होते. हा इतिहास पाहता पक्षाला आगामी निवडणुकीत यापेक्षा जास्त व भरभरून यश मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आता गेल्या पाच वर्षापेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. शिवाय पक्षाकडे ८०% टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारे नेतृत्व म्हणून बीड शहरच नाही तर जिल्हाभरात चर्चेत असणारे अॅड. शफिक भाऊ जिल्हाध्यक्ष पदावर आहेत. त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ वावर व अनुभवाच्या बळावर यावेळी बीड नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही विभागात पक्षाला भरभरून यश मिळण्याची खात्री आहे. शफिक भाऊ हे आपल्याकडून कोणतीही उणीव राहू नये. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट राहावी. याकरिता कंबर कसून कामाला लागले आहेत. याच अनुषंगाने भाऊंनी औरंगाबाद येथे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सय्यद इम्तियाज जलील, राज्य कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, मराठवाडा विभागाध्यक्ष फिरोज लाला, महाराष्ट्र प्रदेश सचिव मौलाना महेफुजुर्रहेमान यांच्या सोबत येणाऱ्या निवडणुका संदर्भात सखोल चर्चा केली.

सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील - खा. इम्तियाज़ जलील 

बीड नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक साठी सर्व पातळीवर जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ सह सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील. सर्वांनी हे लक्षात घ्यावे आगामी या तिन्ही निवडणुकात जनतेच्या सेवेसाठी पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य निवडून आणायचे आहेत. याकरिता सर्वांनी एक दिलाने व एकजुटीने कामाला लागावे.

 

Sharing

Visitor Counter