शिधा धारकांना दिवाळी निमीत शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज

शिधा धारकांना दिवाळी निमीत शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज
जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या हस्ते वितरण
बीड/प्रतिनिधी
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती 1किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील 1 कोटी 70लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 486कोटी 94 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते बुधवार रोजी भालदार पुरा दुकान नंबर 17 येथील जिल्हाधिकारी यांच्या हस्ते साहित्याचे कीट वाटप करण्यात आले
शासन सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना दिवाळी निमीत अन्न व नागरी पुरवठा विभाग शिधाजिन्नस संच वितरण कार्यक्रम शुभारंभ जिल्हाधिकारी राधा बिनोद यांचे हस्ते वाटप करण्यात आले यांच्या नेतृत्वाखाली कीट चे वाटप प्रमुख उपस्थिती साखर 1कीलो पाम तेल 1कीलो हरमरा दाल 1कीलो रवा 1कीलो गहू 1कीलो तांदूळ 1कीलो स्वतः धान्य दूकानदार वाटप करण्यात आले त्यावेळेस उपस्थित राधा बिनोद शर्माजिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुखतहसीलदार सुहास हजारे नायब तहसीलदार चौरे पेशकार मुळीक अव्वल कारकून वायभटनवीदुजमा सय्यद सादिक अली सय्यद महमूद अली अमीन जमा बदरू जमा एजास गरजे के के खान मसीयोद्दीन आदि होते.








