मुळुकवाडी ग्रामस्थांकडुन कृतज्ञतापूर्वक सन्मान ;अग्रीम पिक विमा रक्कम खात्यावर जमा-डाॅ.गणेश ढवळे

मुळुकवाडी ग्रामस्थांकडुन कृतज्ञतापूर्वक सन्मान ;अग्रीम पिक विमा रक्कम खात्यावर जमा-डाॅ.गणेश ढवळे
बीड/वार्ताहर
बीड तालुक्यातील मौजे. मुळुकवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने शेतक-यांना २५ टक्के अग्रीम पिकविमा रक्कम सोयाबीन पिकासाठी हेक्टरी ७७८९ रूपये खात्यावर वर्ग झाली असून दिवाळी गोड होणार या भावनेने लिंबागणेश महसुल मंडळाचा समावेश अग्रीम पिक विमा मिळण्यासाठी दिरंगाई.२९ सप्टेंबर रोजी लिंबागणेश येथे बैलगाड्यांसह चक्काजाम आंदोलन केल्यानंतर जमा झाल्यामुळे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुळुकवाडी सरपंच कृष्णा पितळे,माजी सरपंच गजानन रंदवे, शिवसेना सर्कल प्रमुख दादासाहेब ढास, शिवसंग्राम नेते अविनाश रंदवे,भास्कर ढास,सुरज ढास आदिंच्या पुढाकारातून आंदोलनाची हाक देणारे सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,कृषि विभागातील कृषी सहाय्यक लिंबागणेश ए.डी.वाघ,कृषी सहाय्यक पिंपरनई आर.ए.पेजगुडे,कृषी पर्यवेक्षक चौसाळा एस.सी. काशिद तसेच बजाज अलायन्झ विमा प्रतिनिधी आहिरे या सर्वांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब ढास,चंद्रसेन ढास,पांडुरंग ढास,देवराव भोसले ,अनंता ढगारे,संदिपान ढास,भागवत कदम;शहादेव ढास,पोपट ढास,बळीराम निर्मळ,तुकाराम ढास आदि शेतकरी उपस्थित होते.
शेतकरीपुत्रांच्या संघटीत लढ्याचे यश:-डाॅ.गणेश ढवळे
जिल्हाधिकारी बीड यांनी ३ अधिसुचनेद्वारे एकुण ४७ महसुल मंडळातील शेतक-यांना अग्रीम पिक विमा देण्याचे आदेश देऊन सुद्धा लिंबागणेश महसुल मंडळ वगळण्यात आले होते त्यामुळेच डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२९ सप्टेंबर रोजी लिंबागणेश येथे सर्व शेतक-यांच्या वतीने मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्यांसह चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर लिंबागणेश महसुल मंडळाचा समावेश होऊन लिंबागणेश महसुल मंडळातील २२ गावातील शेतक-यांना अग्रीम पिकविमा मंजूर करून दोन दिवसापुर्वी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. एकंदरीतच शेतक-यांच्या एकजुटीचा विजय असून भविष्यात शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासकीय स्तरावर संघर्ष करण्यात येईल.








