समृद्ध जीवनासाठी साहित्याचे वाचन आवश्यक - डॉ.लक्ष्मण गीते

समृद्ध जीवनासाठी साहित्याचे वाचन आवश्यक - डॉ.लक्ष्मण गीते
केज/प्रतिनिधी
वाचाल तर वाचाल याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने पुस्तक वाचने आवश्यक असून माणसाचे जीवन समृद्ध करण्यासाठी साहित्याचे वाचन अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. लक्ष्मण गीते यांनी केले. ते उद्घाटक म्हणून बोलत होते. सरस्वती महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय व वाड:मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गौतम पाटील होते. प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. सीता केंद्रे व प्रा. डॉ.अलका डांगे या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रा. डॉ. केंद्रे म्हणाल्या की, सुसंस्कार आणि नैतिक मूल्याची जडणघडणीत संत साहित्य अत्यंत मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. डांगे यांनी भारताच्या राष्ट्र निर्माणमध्ये हिंदी साहित्याचे योगदान याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सारिका बुर्गे प्रास्ताविक प्रा. डॉ. वैशाली आहेर तर आभार प्रा. डॉ. संतोष मस्के यांनी मांडले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.








