सरसकट विमा जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू- जितेंद्र आबा शिंदे, शहीद भगतसिंग युवा मंच

सरसकट विमा जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू- जितेंद्र आबा शिंदे, शहीद भगतसिंग युवा मंच
नेकनूर/vartar
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार उडवून सोडला. गेल्या आठवड्याच्या कालखंडामध्ये आष्टी, पाटोदा, परळी, अंबाजोगाई, बीड, गेवराईसह आदी तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. शेतातील खरीपाचे पिके अक्षरश: पाण्यात गेले. अशी गंभीर परिस्थिती आणि शेती पिकाचे महाभयंकर नुकसान व राजेगाव येथील शेतकऱ्याचे आत्महत्या झाल्यानंतरही शासन-प्रशासन नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत कागदी घोडे नाचवून ऑनलाईनचा डांगोरा पिटवत आहेत. विमा कंपनी नुकसानीबाबत ऑनलाईन फोटो डाऊन लोड करण्याच्या सूचना देत आहे. शेतकरी बांधावर गेला तर विमा कंपनीचे सर्वर डाऊन राहते. यामुळे संतापलेले शहीद भगतसिंग युवा मंचचे जितेंद्र आबा शिंदे यांनी सरसकट विमा द्या अन्यथा रस्त्यावर उतरू, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत अधिक असे की, परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर् यांचे हाल करून सोडली आहे. तालुक्यातील बहुतांशी मंडळांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. नद्या नाल्यांचे पाणी शेतात घुसले. सोयाबीन, कापसासह खरीपाचे अन्य पिक अक्षरश: पाण्यात गेले. शेतकर्यांची कधीही न भरून येणारी पिकांची हाणी झाली. हातोंडाला आलेले पीक अक्षरश: उद्ध्वस्त झाले ज्या मुळे जिल्हयातील राजेगावं येतील शेतकरी ने आत्महत्याही केली. हे सर्व उघड्या डोळ्याने शेतकरी तर पहातच आहे, गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासन-प्रशासनालाही ते दिसत आहे मात्र शेतकर्यांना आणखी अडचणीत सापडायचे, व त्यांची थट्टा सूरू आहे असे शिंदेयांनी व्यक्त केले. स्वतः ला शेतकऱ्यांचे प्रतिनिधि बोलून मत मागणारे नेते मंडळी व प्रशासनाने विमा कंपनीसह थेट आता शेतकर्यांच्या बांधावर जावं, लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणार्यांनी या गंभीर बाबीची दखल घेत स्वत:हून बांधावर जात स्वत:च्या उपस्थितीत अधिकार्यांसमवेत पंचनामे करावेत अन्यथा आम्हीं रस्त्यावर उतरू, असा इशारा जितेंद्र आबा शिंदे व शहीद भगतसिंग युवा मंचचे सदस्यांनी केली आहे.








