कमी पटसंख्येच्या शाळा बंदचा निर्णय मागे घ्या-कमलताई निंबाळकर

Beed

कमी पटसंख्येच्या शाळा बंदचा निर्णय मागे घ्या-कमलताई निंबाळकर

बीड/वार्ताहर 

बीड: सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. मात्र, २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे कारण देत शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी केली आहे.

कमी पटसंख्येच्या शाळा बंदच्या निर्णयामुळेे जिल्ह्यातील ६३३ शाळा बंद होऊ शकतात. हा निर्णय गोरगरीब व वंचित घटकातील मुलांवर अन्यायकारक आहे. शाळा बंदच्या निर्णयामुळे ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या तुघलकी निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा कमल निंबाळकर यांनी केला आहे.   शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी आहे प्रवाहात असलेल्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा हा निर्णय अन्यायकारक आहे. यातून सरकारला काय साध्य करायचे आहे, असा सवाल कमल निंबाळकर यांनी केला आहे.

Sharing

Visitor Counter